‘देवबाभळी’साठी प्राजक्त देशमुखला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : नाटय़लेखक प्राजक्त देशमुख यांना साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार २०२० जाहीर झाला आहे. ‘देवबाभळी’ या पुस्तकासाठी प्राजक्त यांना हा सन्मान मिळाला आहे. प्राजक्त यांचे संगीत ‘देवबाभळी’ हे नाटकही रंगभूमीवर गाजत आहे.

साहित्य अकादमी युवा पुरस्कार हा ३५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लेखकांना देण्यात येतो. ताम्रपट आणि ५० हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मराठी आणि बंगाली साहित्याचे युवा पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. मराठी साहित्याचा युवा पुरस्कार प्राजक्त देशमुख यांना ‘देवबाभळी’साठी जाहीर झाला. या पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका आशा बागे, दिलीप प्रभावळकर, लक्ष्मीकांत देशमुख यांच्या त्रिसदस्यीय समितीने काम पाहिले. बंगाली लेखक श्याम बंद्योपाध्याय यांच्या ‘पुराणपुरुष’ या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

‘देवबाभळी’ला नाटकासाठीचे असलेले सगळे पुरस्कार मिळाले आहेत. ‘देवबाभळी’ मला आनंदाचा धक्का देतच आहे. हा पुरस्कार प्रसाद कांबळी आणि आमच्या भद्रकाली प्रॉडक्शनच्या सगळ्या टीमसोबत शेअर करत असल्याचे प्राजक्तने सांगितले. नाटकाला पुरस्कार मिळतोय. आम्हाला नवनवीन प्रयोग करायचे आहेत. रंगभूमीचा पडदा लवकर उघडला जावा, अशी अपेक्षा प्राजक्तने यानिमित्ताने व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here