धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ना.एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

ठाणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रकाश कदम) : गुरुवर्य धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृती जतन केलेल्या ‘ आनंदाश्रम ‘ या कार्यालयात ना. एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्रतापूर्वक अभिवादन केले. यासमयी टेंभी नाका येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करित आदरांजली वाहिली.

यानंतर स्थानिक नगरसेविका व उपमहापौर सौ.पल्लवी कदम व मा.नगरसेवक पवन कदम यांनी आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत आनंदआश्रमा बाहेरील फुटपाथलगत वृक्षारोपण केले.

anant-dighe-thane

याप्रसंगी वंदनीय गुरुवर्य स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांची समाधी असलेल्या ‘शक्तीस्थळा’ला भेट देऊन पवित्र स्मृतींस विनम्रपणे अभिवादन केले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शक्तीस्थळावर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या दिवसाचे औचित्य साधून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे महानगरपालिकेला ३ रुग्णवाहिका दिल्या असून या रुग्णवाहिकांचे लोकार्पण यासमयी करण्यात आले.

eknath-shinde-at-thane

याप्रसंगी आमदार प्रताप सरनाईक, ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर सौ.पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, शिक्षण समिती सभापती योगेश जानकर, परिवहन समिती सभापती विलास जोशी, नगरसेवक राम रेपाळे, नगरसेवक सुधीर कोकाटे, शहरप्रमुख हेमंत पवार आणि समस्त शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here