मुंबई (महाराष्ट्र संपादक सुनिल पाटील) : नौपाडा पोलीस ठाणे येथे फिर्यादी नारो गिगा परत जैन, ग. निळकंट पाया., मखमली तलाव, ठाणे यांनी त्यांचे पती बी.के. ज्वेलर्सचे पालक गिरत हस्तीमल जैन, वय- ८० वर्ष, यांचे दिनांक १४/०८/२०२१ रोजी कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केले असल बावन नौपाडा पोलीस स्टेशन गुन्हा.रजि.क. २४० / २०२१ भादवि कायदा कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाचा तपास सुरु असताना दिनांक २०/०८/२०२१ गनी सदर अपहृत इसम भरत हस्तीमल जैन यांचे शव रेती बंदर कळवा खाडी, कळवा, टाण या ठिकाणी मिळून आल्याने नमुद गुन्हयात भादवि कलम ३०२, ३६३, ३६८, २०१, २१६(अ), ३४ हे वाढीव कलम समाविष्ट करण्यात आले.
मा.पोलीस आयुक्त श्री जयजीत सिंग, मा.सह पोलीस आयुक्त, श्री सुरेश मेखला मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री अनिल कुंभारे, मा. पोलीस उप आयुक्त अविनाश आंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री व्यंकट आंधळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयाचे तपासी अधिकारी पोनि, प्रशासन, श्री अविनाश सोंडकर यांचे अधिपत्याखाली दोन तपास पथके नेमण्यात आली. सदर तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी मा. वपोनि नौपाडा पो.स्टे. श्री रविंद्र क्षिरसागर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास सुरु करुन मयत इसम भरत जैन यांचे दुकानातील परीसरातील १६ हुन अधिक सिसिटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली असता एक संशयीत वॅगनार कार सदर परिसरात फिरताना आढळल्याने सदर कार चालकाचा शोध घेउन कार चालक नामे सुभाष बाबुराव सुर्वे, वय ३९ वर्षे, राह. घणसोली, नवी मुंबई यास ताब्यात घेतले. सदर वॅगनार चालकाकडे कौशल्यपुर्व व तांत्रीक तपास केला असता त्याने त्याचे साथीदार नामे अतुल जगदिशप्रसाद मिश्रा, वय २५ वर्षे, राह. सिध्देश्वर तलाव, ठाणे व निलेश शंकर भोईर, वय ३५ वर्षे, राह. महात्मा फुले नगर, कळवा, ठाणे यांचे सोबत मिळुन सदर गुन्हयाचा कट रचल्याचे कबुल केले.
आरोपीत अतुल मिश्रा हा मयत राहत असलेल्या सोसायटीत अडीच वर्षापुर्वी वाँचमन म्हणुन कामास होता. त्यामुळे त्यास मयत याचे ज्वेलर्सचे दुकान असल्याचे तसेच त्याच्या दुकानात जाण्याचा व येण्याचा कालावधी माहित होता. सदर माहितीचा फायदा आरोपीत यांनी घेउन मयत हे दि. १४/०८/२०२१ रोजी रात्री १०:३० वा. च्या सुमारास घरी पायी जात असताना त्यास त्याचे रहाते घराचे मखमली तलाव परिसरातुन आरोपीत यांनी बळजबरीने त्यांच्या कडील वॅगनार कारमध्ये बसवुन त्यास मुंबई-नाशिक हायवेवर घेवून जावुन चालत्या वॅगनर कारमध्ये मयत याचा रस्सीने गळा आवळून खुन केला. त्यानंतर मयत याचे खिशातील दुकानाची चावी काढून घेवून मयत याचे शव कळवा खाडीत फेकुन दिले. त्यानंतर आरोपीत यांनी मयत याचे बी.के. ज्वेलर्स हे दुकाना चावीने उघडून दुकानातील चांदीचे धातुचे दागिणे व भांडी चोरी केली.
नमुद गुन्हयातील आरोपत नामे निलेश शंकर भोईर, वय ३५ वर्षे, रा. कळवा, ठाणे व अतुल जगदीशप्रसाद मिश्रा, वय २५ वर्षे, रा.सिध्देश्वर तलाव, ठाणे पश्चिम हे कल्याण-कोईबत्तुर-ओरीसा-बिहार मार्गे उत्तरप्रदेश येथे पळून जात असल्याचे तांत्रिक तपासाव्दारे निष्पण्ण झाल्याने वाराणसी, उत्तरप्रदेश येथे एक तपास पथक पाठविण्यात येवून दोन्ही पाहीजे आरोपीतांना वाराणसी, उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेवून अटक करण्यात आली.
दोन्ही पाहीजे आरोपीतांना पळून जाण्याकरीता मदत करणारा इयम नामे बळवंत मारूती चोळेकर, वय ३६ वर्षे, धंदा म्हारळगाव, कल्याण यास अटक करण्यात आली असून त्याचेकडून गुन्हयातील चोरीस गेला मुद्देमाल रू. १,२८,०००/- किंमतीची २ किलो वजनाची चांदीचे धातुची भांडी व दागिणे जप्त करण्यात आले आहेत तसेच आरोपीत सुभाष बाबुराव सुर्वे याचेकडून गुन्हयात वापरलेली बॅगनर कार जान करण्यात आली आहे.
यातील अटक आरोपीत नामे निलेश शंकर भोईर याचे कडून गुन्हयात मयत याय धमकविण्याकरीता वापरलेला एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतुस, एक कंट्री मंड रिव्हालवर जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचे तपास हा पोनि प्रशासन अविनाश सोंडकर, सपोनि निलेश मोरे, पोउपनि विनोद लभडे, पोह/६१५७ भोसले, पोह/६२०७ जाधव, पोह/५७२९ तावडे, पोना/८८१७ निकुंभ, पोना/२२२७ राठोड, पोना/५६ रांजणे, पोना/६७१७ चडचणकर, पोना/८८१ चव्हाण, पोना/६४५३ कुरकुटे, पोशि/३७०५ राठोड, पोशि/४२७४ येळवे यांचे तपास पथकाने मा.वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली केला आहे. गुन्हयाचे तपासात तांत्रिक विश्लेषणाचे महत्वाचे काम पोशि/३७०५ राठोड नौपाडा पो. स्टे. व पोना/७२६१ माळी, पोलीस उप आयुक्त कार्यालय, ठाणे यांनी केले आहे.






