“सांबर” या संरक्षित वन्य प्राण्याचे शिंग विक्री करण्यास आलेल्या इसम व महिलेस गुन्हे शाखेकडुन अटक

मुंबई (संपादक सुनिल पाटील) : दिनांक २५/०८/२०२१ रोजी गुप्त बातमीदाराकडून अशी खबर प्राप्त झाली की, हकिकत १६:४५ वाजताच्या सुमारास एक महिला व एक पुरूष हे शेठ र. व. आयुर्वेदिक रूग्णालय जवळ, सायन, मुंबई या ठिकाणी “सांबर” या संरक्षीत वन्यजीव प्राण्याची दोन शिंगे विक्रीकरता येणार आहेत. त्यावरून गु.प्र.शा., गु.अ.वि., कक्ष-४ चे अधिकारी, अंमलदार व वन विभागाचे अधिकारी यांचे पथक तयार करण्यात येवून घटनास्थळाच्या परिसरात सापळा रचण्यात आला होता.

साधारण १७:०५ वाजण्याच्या सुमारास नमुद ठिकाणी एका ऑटो रिक्षामधून एक पुरुष व महिला सदर ठिकाणी आले त्यावेळी महिलेच्या हातामध्ये एक सफेद रंगाची आतमध्ये काहीतरी भरलेली पॉलीथीनची गोणी दिसत होती. त्यांच्या सदर ठिकाणीच्या हालचाली संशयीत वाटल्याने लागलीच सदर ठिकाणी सापळा रचून थांबलेल्या पोलीस पथकाने त्यांना घेराव घालून ताब्यात घेतले. व नमुद महिलेच्या हातात असलेल्या पॉलीथीनच्या पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये साधारण प्रत्येकी दोन किलो वजनाची “सांबर” या संरक्षीत वन्यजीव प्राण्याची दोन शिंगे मिळून आली. पथकातील वन विभागाचे अधिकारी यांनी सदर शिंगांची तपासणी करून ती “सांबर” या संरक्षीत वन्यजीव प्राण्याची असल्याचे खात्रीशीर सांगितले. त्यानंतर नमुद मुद्देमालाचा पंचनामा करून ताब्यात घेण्यात आली. तसेच नमुद महिला व पुरूष आरोपीस ताब्यात घेवून सायन पोलीस ठाणे येथे घेवून जावून त्यांचे विरूध्द सायन पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा नोंद करून त्यांना नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

 

सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस सह आयुक्त(गुन्हे) श्री मिलिंद भारंबे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री एस विरेश प्रभु, मा.पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण), श्री. प्रकाश जाधव, मा.सहाय्यक पोलीस आयुक्त (डी-मध्य), श्री. नितीन अलकनुरे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक इंद्रजित मोरे, सपोनि. यशवंत शिंदे, सपोनि. बिभीषण गव्हाणे, मपोह. शर्मिला निखाडे, पोह. साळोखे, पोह. बल्लाळ, पोह. तळेकर, पोना. पाटील, पोशि. जगताप, पोशि. साळुखे यांनी पार पाडलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here