अभिनेता राणा दग्गुबातीला ईडीने बजावला समन्स

हैदराबाद : बॉलिवूडमधील गाजलेले ड्रग्ज प्रकरण आता पुन्हा जोर पकडू लागलं आहे. बाहुबली चित्रपटामधील भल्लालदेवची भूमिका करणारा अभिनेता राणा दग्गुबातीला ईडीने समन्स बजावला आहे. राणासह अभिनेत्री रकुलप्रीत सिंह आणि आणखी १० कलाकारांचीही चौकशी केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हे चार वर्षांपूर्वीचं ड्रग्ज प्रकरण आहे. २०१७ साली तेलंगाणा उत्पादन शुल्क विभागाने ३० लाख रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं होते. यानंतर १२ प्रकरणं नोंदवण्यात आली. आता ईडीने या प्रकरणा मनी लाँड्रिंगबाबत कारवाई सुरू केली आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तेलंगणा उत्पादन शुल्क विभागामार्फत जवळपास १२ प्रकरणांची नोंद आहे आणि ११ चार्जशीट दाखल करण्यात आल्या आहेत. बहुतेक ड्रग्ज तस्करांचा यात समावेश आहे. आम्ही उत्पादन शुक्ल विभागाच्या अधिकाऱ्यांना साक्षीदार म्हणून बोलावलं आहे. तसंच टॉलीवूड सेलिब्रिटीही पुरावे सापडेपर्यंत साक्षीदारच असतील.

मिळालेल्या माहितीनुसार ईडीने राणा दग्गुबाती आणि रकुलप्रीत सिंहला या प्रकरणी चौकशीसाठी बोलावलं आहे. रकुलप्रीत सिंहला ६ सप्टेंबर, राणा दग्गुबातीला ८ सप्टेंबर आणि रवी तेजाला ९ सप्टेंबरला बोलावण्यात आलं आहे. याशिवाय चरमी कौर, नवदीप, मुमैथ खान, नंदू, तरुण, तनीष आणि रवीचा ड्रायव्हर यांनाही समन्स बजावण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here