इचलकरंजी नगरपालिका सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात खासदार धैर्यशीलदादा माने यांच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय करणार – तानाजी पोवार

इचलकरंजी (महाराष्ट्र सह संपादक मनोज सोनवले) : नगरपरिषदेकडील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत कर्मचारी संघटनेचे निवेदन वेळोवेळी देणेत आले आहे.याबाबत नगरविकास विभागाकडेही वरील मागण्यांचे निवेदन कळविणेत आले आहे.तथापी याबाबत शासन स्तरावर अद्यापी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. नगरपरिषद कर्मचारी सन २०१९ पासून सातत्याने महापूर, कोव्हिड-१९ या आपत्कालीन कामकाजामध्ये अहोरात्र काम करत आहे.परंतु नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांसंदर्भात शासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. अशी भावना कर्मचाऱ्यांची निर्माण झाली आहे.उपरोक्त विषयांबाबतच्या मागण्यांबाबत आपण तात्काळ लक्ष घालू नगरपरिषद कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.

या निवेदनात (१) नगरपरिषदेस देणेत येणारे सहा.अनुदान कमी प्रमाणात येत असून त्यामुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांची देणी व अत्यावश्यक खर्च भागविणे अडचणीचे झालेने सहा.अनुदान पुर्वीप्रमाणे वाढवून देणेत यावे.. (२) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे नगरपरिषदेकडील,नगरपंचायत कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अदयाप देय असलेल्या ७व्या वेतन आयोगाच्या थकबाकी प्रदान करणेत आलेले नाही.सबब राज्यशासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे ७व्या वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता तात्काळ मिळावा.. (३) इचलकरंजी नगरपरिषदेकडील सेवेत असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्यांचे वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेकरिता व्यपगत झालेली पदे पुनर्जिवित करणेत यावीत.. (४) सफाई कर्मचाऱ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेतून मालकी हक्काची घरे बांधून देणेत यावी.. (५) सफाई कामगारांच्या / कर्मचाऱ्यांच्या वारसास वारसा पध्दतीने नेमणूक देण्याची कार्यपध्दती यापुढेही सुरु ठेवणेत यावी.. (६) सातव्या वेतन आयोगामध्ये, तीन लाभांच्या सुधारीत सेवांर्गत आभ्यासित प्रगती योजना अनुज्ञेय करणेबाबत.. (७) नगरपरिषदेकडील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणेत यावी.. (८) राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दि.१ एप्रिल २०१० पासून नगरपरिषद कर्मचारी नगरपंचायत कर्मचारी यांना आश्वसित प्रगती योजना लागू करणेत यावी.. (९) नगरपरिषदेतीलल सर्व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना पुर्वीप्रमाणे विशेषबाब या योजनेखाली नोकरीमध्ये नियुक्ती देणेत यावी.. (१०) शासन परिपत्रकानुसार सफाई कर्मचारी यांना देणेत येणाऱ्या सुट्टी दिवसाचा पगार अन्य अत्यावश्यक सेवेतील नगरपरिषद कर्मचाऱ्यांनाही सुट्टीदिवशी केले कामाचा मोबदला देणेत यावा.. (११) नगरपरिषद, नगरपंचायतमधील कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूने मयत झाल्यास रू.५० लाख विमा संरक्षणाची रक्कम तात्काळ देणेत यावी व वारसांना तात्काळ नगरपरिषद /नगरपंचायतीमध्ये विशेष बाब म्हणून सेवेत नियुक्ती देणेत यावी.. (१२) सफाई कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देताना शैक्षणिक अर्हतेची अट शिथील करणेत यावीत.. (१३) राज्यस्तरीय संवर्गातील अधिकाऱ्यांचे NPS (राष्ट्रीय निवृत्ती योजना) खाती उघडणेबाबत.. (१४) अंशदायी पेन्शन योजना रद्द करून पुर्वीप्रमाणेच पेन्शन योजना चालू करणेत यावी.. (१५) महाराष्ट्र नागरी सेवा(सुधारीत वेतन) नियम, २००९ सुधारीत वेतन संरचनेत वार्षिक वेतनवाढीच्या वेळी वेतनबँड मधील वेतन कमाल टप्प्यावर पुढील रक्कमेवर जात असल्यास वेतननिश्चिती करणेबाबत मागण्या मांडण्यात आल्या आहेत.

tanaji-powar-ichalkarani

या सर्व प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात इचलकरंजी नगरपालिका सर्व कामगार संघटना कृती समितीतर्फे आज दि.२६ ऑगस्ट रोजी.उपनगराध्यक्ष दालनात इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा..तानाजी पोवार यांची प्रत्यक्ष भेट घेत निवेदन देण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी इचलकरंजी नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या निवेदनाद्वारे देण्यात आलेल्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन स्तरांवर आपण स्वतः गेली अनेक वर्षे पाठपुरावा करत आहे.. सध्याच्या २०१९ महापूर..२०२० कोरोना..२०२१ कोरोना,महापूर..या नैसर्गिक आपत्तीच्या काळात शासन स्तरांवरील मंत्रिमंडळाच्या बैठका घेणे शक्य झाले नाही,पण खासदार धैर्यशीलदादा माने यांच्याकडे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत वेळोवेळी संपर्कात असून खासदारांच्या माध्यमातून या सर्व प्रलंबित मागण्यांसंदर्भात दि.०१ सप्टेंबर नंतर मंत्रिमंडळ बैठकीचे नियोजन करण्यांत येणार आहे, त्यामधून संदर्भीय मागण्यांबाबत सविस्तर माहिती देऊन सकारात्मक निर्णय करून..व सफाई कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत घरकुलांसाठी इचलकरंजी नगरपालिकेकडून सर्वानुमते जागा लवकरांत- लवकर उपलब्ध करून देण्याची महत्त्वपुर्ण आश्वासक ग्वाही, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी याप्रसंगी दिली.

ichalkaranji-nagarparishad-employee

इचलकरंजी नगरपालिका सर्व कामगार संघटना कृती समितीतर्फे निवेदन देण्यात आलेल्या शिष्टमंडळात जनरल सेक्रेटरी के.के.कांबळे, अध्यक्ष आण्णासाहेब कागले, संपत तांबिरे. शंकर अगसर. संजय कांबळे. शितल पाटील. संजय शेटे, नौशाद जावळे, हरी माळी, चंद्रकांत कोठावळे तसेच इचलकरंजी नगरपालिका सर्व कामगार कृती समित्यांमधील जनरल कामगार संघ (इंटक).. म्युन्सिपल वर्क्स युनियन (इंटक).. इचलकरंजी नगरपालिका कामगार युनियन (सीटू)..आदर्श कामगार युनियन..स्वाभिमानी कामगार संघटना..भारतीय मजदूर संघ (संलग्न).. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस नगरपालिका कर्मचारी संघटना..यांचा प्रत्यक्षरित्या प्रामुख्याने सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here