इचलकरंजी (महाराष्ट्र सह संपादक मनोज सोनवले) : इचलकरंजी शहरात मुख्य रस्ते हे तीनच आहेत, इचलकरंजी शहर हे छोटे शहर असले कारणाने सम-विषम पार्किंग व्यवस्थेमुळे व्यापारी वर्ग व नागरिकांना याचा फायदा न घेता नाहक त्रासच सहन करावा लागत आहे. शंभर फूटी पेक्षा मोठे रोड असताना सम-विषम पार्किंगची गरज नाही.रस्त्याच्या दोन्ही बाजूला पार्किंग राहिल्यास रहदारीस कोणताही अडथळा होत नाही. तरी शहरात दोन्ही बाजूला पार्किंग करणेस परवानगी मिळावी आणि रस्त्यावरील दोन्ही बाजूला पार्किंगचे पट्टे ताबडतोब नगरपालिकेने आखणी करावेत असे निवेदन आम आदमी पार्टी, इचलकरंजी यांचेकडून आज दि.२६ ऑगस्ट रोजी इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा..तानाजी पोवार यांना उपनगराध्यक्ष दालनात दिले..
त्यांच्या निवेदनाची तत्पर दखल घेत उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी इचलकरंजी शहरांतील सम-विषम पार्किंग बंद करून रस्त्यावर पार्किंग पट्टे आखण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखा, इचलकरंजी व संबंधित नगरपालिका प्रशासनातर्फे प्रमुख अधिकारी यांचेशी फोनवरून संपर्क साधून निर्णय करणेसाठी आढावा बैठक घेऊन निर्णय करून,अशी आश्वासक ग्वाही दिली.

आम आदमी पार्टीतर्फे निवेदन दिलेल्या शिष्टमंडळात कृष्णात काणेकर, जावेद मुल्ला, प्रकाश सुतार, रावसाहेब पाटील, वसंत कोरवी, स्वप्निल शेडबाळे, माधुरी शेडबाळे, माधुरी सुर्यवंशी तसेच कार्यकारणी प्रमुख सदस्य होते.






