यंत्रमाग उद्योगांच्या वीज बिल वसुलीबाबत आमदार प्रकाशअण्णा आवाडे यांचे ऊर्जामंत्र्यांना निवेदन

इचलकरंजी (महाराष्ट्र सह संपादक मनोज सोनवले) : यंत्रमाग उद्योगांच्या वीज बिलांची सक्तीने वसुली होत असलेबाबत आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत व कार्यकारी अभियंतासो प्रशांत राठी यांना निवेदन दिले.

गेल्या ४ ते ५ वर्षांपासून वेग-वेगळ्या कारणाने यंत्राग उद्योग अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. त्यातच कोरोनाच्या महामारीमुळे तर हा उद्योग अत्यंत अडचणीत आला आहे. लॉकडाऊनमुळे पूर्ण भारत भरातील बाजारपेठा बंद असल्याने तसेच रिटेल मार्केट बंद असल्याने यंत्रमागधारक / व्यापारी यांचे व्यापारी येणे बंद असल्या कारणाने यंत्रमाग उद्योजक लाईट बिले एकावेळी भरू शकले नाहीत. यामुळे मागीलवर्षी लाईट बिलाचे हप्ते करून देणेत आले होते. मार्च २०२१ ला पुन्हा एकदा कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लावणेत आला. यामुळे परत बाजारपेठा व रिटेल मार्केट बंद झाल्या.

prakashanna-awade

अजूनही बाजारपेठा सुरळीत सुरू नसल्याने मालास मागणी / गिऱ्हाईक नसल्याने उत्पादन व मालाच्या विक्रीत प्रचंड प्रमाणात अडचणी येत आहेत. यामुळे यंत्रमागधारकांना आर्थिक संकटांना तोड द्यावे लागत आहे. यामुळे यंत्रमागधारकांना एकावेळी उद्योगांची वीज बिले भरणे अवघड झाले आहे. त्यांना शक्य आहे तीतके त्यांनी वीज बिल भरलेले आहेत. पण सध्या महावितरणकडून ५०% रक्क भरणेची सक्ती करणेत येत आहे. व वीज बिल न भरल्याने यंत्रागधारकांची वीज केनेक्शन सक्तीने तोडणेत येत आहे. यंत्रमाग कारखानदार हे वीज बिल भरणार आहेत. पण त्यांचे व्यापारी येणे येत नसलेने त्यांना तातडीने ५०% रक्क भरणे शक्य नाही. मार्च २०२१ मध्ये बंद झालेली थकीत वीज बिलाच्या हप्त्याची योजना मार्च २०२२ पर्यंत सुरू ठेवणेत यावी. यंत्रमागधारक हे माहे मार्च २०२१ पर्यंतची यंत्रमागधारकांची थकीत वीज बिले भरणेस तयार आहेत. ऊर्वरीत रक्कमेसाठी समान हप्ते करून द्यावेत. थकबाकीसाठी यंत्रमागधारक व उद्योजकांचे लाईट कनेक्शन बंद करू नये. सक्तीने यंत्रमाग कारखान्यांची वीज कनेक्शन बंद केल्यास यंत्रमाग उद्योजकांसह कामगार व या उद्योगावर अवलंबुन असलेल्या इतर उद्योगातील कामगार यांचा पोटाचा प्रश्न निर्माण होणार आहे. तसेच वीज कनेक्शन तोडल्यास यंत्रमागधारकांचे बँकांचे कर्जे व हप्ते थकतील व ते आणखीनच अडचणीत येतील. त्यामुळे याबाबत आपणाकडून तातडीने योग्य ते आदेश देण्यात व्हावेत या मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, पॉवरलुम असोशियन अध्यक्ष सतीश कोष्टी, उपाध्यक्ष दत्तात्रेय कनोजे, चंद्रकांत पाटील, नारायण दुरगुडे, मोहम्मद रफीक खानापुरे, सोमा वाळकुंजे, चंद्रकांत भोपळे, प्रमोद महाजन, सुभाष बलवान, पांडुरंग सोलगे व यंत्रमाग धारक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here