धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने धर्मवीरांच्या शक्तिस्थळावर त्यांना अभिवादन

ठाणे (विशेष प्रतिनिधी जगदीश काशीकर) : प्रताप सरनाईक फाउंडेशन व विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सर्व वैद्यकिय उपकरणांसहित सुसज्ज दोन कार्डियाक अँब्युलन्स, दोन ब्लड डोनेशन व्हॅन, कर्करोगाचे निदान जागेवर तात्काळ होण्याकरीता एक कर्करोग निदान व्हॅन व शितपेटीसह दोन मोक्षरथ अशा सर्व वैद्यकिय सुविधा ठाणेकर नागरिकांना २४ तास मोफत उपलब्ध होणार आहेत.

आज या सर्व सुविधा उपक्रमांचा, वाहनांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री एकनाथ शिंदे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्ताने धर्मवीरांच्या शक्तिस्थळावर त्यांना अभिवादन करून हा कार्यक्रम झाला. या सर्व आरोग्य सुविधा नागरिकांना वर्षभर व 24 तास विनामूल्य उपलब्ध असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here