जळगाव (निलेश पाटील) – साने गुरुजी हायस्कुल अमळनेर म्हटल की आठवत तेथील शिस्त, अध्यापन ,अध्ययन तसेच जीवन मुल्याची जडणघडण .ह्याच शाळेतील एक प्रयोगशील, उपक्रमशील शिक्षक संदिप घोरपडे तसेच हया संस्थेचे सचिव . हया शिक्षकाने आधुनिक युगात म्हणजेच गुण मिळविण्यासाठी चालत असलेल्या शर्यतीत स्वंय अध्ययनाचा सुंदर उपक्रम राबऊन विदयार्थ्यांना केवळ घोका व ओका या संकल्पनेच्या बाहेर नेऊन ताणमुक्त, आनंददायी, आरोग्यदायी, नेर्तृत्वशील,शील संपन्न तसेच सर्वांगीण विकास करणारे शिक्षण देऊन यशस्वी करून दाखविले
यासाठी त्यांनी साने गुरुजी कन्या शाळेतील ९ मुली निवडुन त्यांना शिकवणी मुक्त स्वंय अध्ययनाचे वर्षभर सर्वच कौशल्याचे धडे देऊन उत्कृष्ट पीढी घडेल असे शिक्षण देऊन सर्वच विदयाथीनीं ज्या उपक्रमात सहभागी होत्या . त्यात शेवटी ६ विदयाथीनी राहिल्या परंतु अवलिया शिक्षकाने हिम्मत न सोडता उपक्रम राबविला .त्यात म .गांधी, रविंद्रनाथ टागोर , बाबा आमटे , कृष्णमुर्ती,डॉ . कलाम तसेच साने गुरुजींच्या विचाराची ज्योत घेऊन हा स्वंय अध्ययनावर आधारित उपक्रम १० वी च्या विदयार्थीनींसाठी राबऊन त्यांना योग,प्राणायाम, ध्यान,चिंतन, प्रत्यक्ष कृती त्यातुन अनुभूती या द्वारे कोणतीही शिकवणी न लावता .तज्ञ मंडळींचे सहकार्य घेऊन गुणांच्या पाठीमागे न लागता जीवनात प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटविता येइल असे तणावरहित शिक्षण त्यांना दिले .
विदयार्थीनी चर्चा,सेमीनार, सुसंवाद, मार्गदर्शन वर्गाद्वारे स्वतःची वैचारिक पायाभरणी करत गेले . त्या विदयाथीर्नींना प्रत्यक्ष शेती व त्यात बी रुजविणे ते मार्केटींग तसेच बँक व बँकेचे सर्व व्यवहार,निवडणुक पासुन निवडुन येण्याच्या प्रक्रियेपर्यंत प्रक्रिया, निसर्गातील अनुभुती, जेष्ठ विचारवंताच्या भेटी, अभ्यास करण्याच्या मानसशास्त्रीय पध्दती , विविध अध्यापन पद्धतीचा आस्वाद घेत मुली जीवनाच्या कुठल्याही बाबतीत कमी पडणार नाही, खचणार नाही, निराश होणार नाही , भारताचे एक सर्वगुणसंपन्न मानवी संपत्ती बनतील असे शिक्षण देऊन घडविले . दहावीच्या वार्षिक परीक्षेत ८० % टक्केच्या वर गुण संपादन करून यशस्वी झाल्या .
संदिप घोरपडे आपल्या विना शिकवणीच्या अ…. आ आकलनाच्या स्वयंअध्ययनाच्या उपक्रमात यशस्वी झाले . त्यात त्यांनी स्वतःची मुलगी कु.भुमीका संदिप घोरपडे ९३.६०% कु.जान्हवी शांताराम जाधव ९२.२०% कु.अनुष्का मंगेश महिंद ८३.४०% कु. वैष्णवी आशिष पवार ८२.६०% कु.दिपिका प्रेमराज सोनवणे ८१.४०% व कु.देवयानी जगदिश वंजारी ८०.४०% पर्यंत स्वंय अध्ययनाच्या कृतीने ,हसत खेळत पोहचविले. जरी इतर मुलांच्या मानाने गुण कमी असले तरी हया विदयाथीनी योगा ते खेळ,शेती ते मार्केटींग, नेर्तृत्व ते व्यवस्थापन,संगित,गायन, अध्ययन ते चिंतन, मनन या सुंदर रचलेल्या पुर्वजांच्या अनुभवलेल्या अनुभूतीचा योग्य परिपाक घेऊन जीवन सर्वच आघाडीवर उत्कृष्टपणे आत्मनिर्भर होऊन जगतील यात शंकाच नाही








