मुंबई (प्राजक्ता अरूण चव्हाण) – नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने व्यसनमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी नेहमीच
विविध कार्यक्रम घेऊन समाजातील व्यसनधीनता संपविण्यासाठी सक्रीय आहे. महाराष्ट्र मध्ये अनेक सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. याच माध्यमातून रक्षाबंधन हा भारतीय संस्कृतीतील अडचणीवर मात करुन रक्षण करण्याचा व आभार मानन्याचा उत्सव या निमित्ताने नशाबंदी मंडळच्या महिला भगिणीनी व्यसनमुक्तीशी बंधन!, व्यसनापासून रक्षण!. हा संदेश असलेल्या राख्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांना सोशल मिडीयाच्या वतीने मेलवर पाठवून. ‘व्यसनांना हवे लॉकडाऊनचे बंधन, तेव्हाच होईल महिलांचे रक्षण’ असे अवाहान केले आहे. त्यासोबतच महाराष्ट्र व्यसन मुक्त व्हावा. यासाठी व्यसनमुक्त धोरण २०११ ची प्रभावी अंमलबजावणी करावी.
महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्त व्हावा यासाठी तुम्ही कटीबध्द आहे. अशी तुमची भुमिका नेहमीच राहीली आहे. या रक्षाबंधन निमित्ताने नशाबंदी मंडळाच्या महिला प्रतिनिधी राज्यातील सर्व महिला भगीणीचे व्यसनापासून आणि त्यामुळे होणाऱ्या बलात्कार, अत्याचार पासून रक्षण करावे व व्यसनांना कायमचा लॉकडाऊन लावावा. ही अपेक्षा करीत आहेत. महाराष्ट्रातील जिल्हा संघटक व महिला कार्यकर्ते राख्या बांधून व्यसनमुक्तीचा प्रचार व प्रसार करुन मोठ्या प्रमाणात जागृती केली असल्याची माहिती मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास व सचिव अमोल मडामे यांनी दिली आहे.
कोरोना कोवीड – १९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमानुसार सोशल डिसस्टिंग पाळून नशाबंदी मंडळाच्या वतीने राज्यातील, जिल्ह्यातील लोक प्रतिनिधी
यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील खासदार, पालकमंञी, आमदार, नगरसेवक, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि समाजकल्याण अधिकारी यांच्या सह व्यसनमुक्तीसाठी कार्यरत व्यक्ती व संस्था यांना राखी बांधण्याचा कार्यक्रम संपन्न झाला आहे.
यावेळी मंडळाच्या सहकार्याने ज्या व्यक्ती व्यसनमुक्त झाल्या आहेत. त्यांच्या भेटी घेऊन त्यांचे रक्षाबंधन देखील केले. पुढील काळात नशाबंदी मंडळाच्या वतीने व्यसनमुक्त महाराष्ट्र, सक्षम महाराष्ट्र हे अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठीच समाजातील संस्था, संघटना यांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे अवाहान या रक्षाबंधन निमित्ताने करण्यात आले आहे. अशी माहिती मडंळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास आणि सचिव अमोल मडामे यांनी स्पष्ट केली आहे.







