मंत्रालयात वैभव गीतेंचा आक्रमक पवित्रा; अपर मुख्य सचिव अरविंद कुमार यांचे पोलीस महासंचालकांना कारवाईचे आदेश
मुबंई (विशेष प्रतिनिधी) : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील बोरगाव-माळेवाडी या गावात मातंग समाजाच्या धनाजी अनंता साठे यांचेmp0 प्रेत अंत्यविधी करण्यासाठी गावातील रवींद्र शहाजी पाटील सह 13 जणांवर अकलूज पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 20/8/2021 रोजी एट्रॉसिटी व भादवीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करुन देखील आरोपींवर कडक कारवाई झालेली नाही.
त्यामुळे या प्रकरणी नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव ऍड.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनात राज्य सचिव वैभव गिते व ठाणे प्रसिद्धी प्रमुख संदेश भालेराव यांनी थेट मंत्रालयात जाऊन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सनदी अधिकारी अपर मुख्य सचिव अरविंद कुमार यांच्या केबिनमध्ये घुसून जाब विचारला वैभव गिते व संदेश भालेराव यांचा आक्रमक पवित्रा घेऊन अपर मुख्य सचिव यांनी मंत्रालयीन अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली.आरोपींवर कडक कारवाई करण्याचे लेखी निवेदन देऊन चर्चा केली.

राज्याचे पोलीस महासंचालक व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागितला.आठ दिवसात कारवाई न झाल्यास आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा वैभव गिते यांनी शासनास दिला आहे.त्यामुळे मंत्रालयीन वातावरण गंभीर व गरम झाल्याचे दिसत होते.






