गोविंदराव कोते पा. व पापाभाई पठाण यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश; शिर्डी शहर काँग्रेसचा बालेकिल्लाच आहे हे सिद्ध होईल

शिर्डी (प्रतिनिधी) : सर्व सामान्य परंतु निडर आणि लढवय्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे शिर्डी शहरात काँग्रेसचा प्रभाव वाढत असून प्रस्थापित लॉबीच्या विरोधात वंचितांना,गोरगरिबांना,सामान्यांना,बेरोजगारांना सोबत घेऊन वाटचाल करणाऱ्या काँग्रेसला अपेक्षित असलेल्या सामान्य कुटुंबातील तरुणांची साथ लाभत आहे.फक्त पैशावाल्यानी आणि पांढरपेशा पुढाऱ्यांनीच राजकारण करावं असं काही नसतं हे सिद्ध करण्याबरोबर याच सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या साथीने आणि प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले,राज्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात,आ.डॉ सुधीर तांबे साहेब युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांच्या नेतृत्वात आगामी शिर्डी नगर-पंचायतच्या निवडणुकीत कॉंग्रेस पूर्ण शक्तीनिशी स्वबळावर मैदानात उतरणार असून,नव्या-जुण्या कार्यकर्त्यांचा मेळ घालून यशस्वी लढा दिला जाईल.

यावेळी माजी नगरसेवक सुरेश आरणे,एडवोकेट अविनाश शेजवळ,मदन मोकाटे,मंगेश खाकाळे,सौरभ हाडवळे,अरबाज कादरी,मोहसिन सय्यद,गुड्डू शेख,दिपक चौगुले,योहान गायकवाड,कृष्णा गायकवाड,ज्ञानेश्वर हातांगळे,इस्माईल शहा,रमेश सोनवणे,चंद्रकांत पवार,शिवा भोंडगे, संतोष वाघमारे,महावीर धुताडमल,नजीरभाई कादरी,रज्जाकभाई शेख,तोहिद पठाण,सरदारभाई पठाण,सिकंदर पठाण,अक्रम सय्यद,सोहेल सय्यद,आदम सय्यद,दिलावर शेख, मयुर मते,विशाल अहिरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here