औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : गेवराई (सा.वा) राक्षसभुवन येथील गोदापात्रात धुणे धुण्यासाठी गेलेल्या सख्या दोन बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार रोजी दुपारी 12 वाजता घडली.
गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील गोदा पात्रामध्ये धुणे धुण्यासाठी गेलेल्या नेहा धर्मराज कोरडे वय (9 वर्ष) व अमृता धर्मराज कोरडे वय (8 वर्ष) यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवार रोजी दुपारी बारा वाजता घडली.
या घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिस स्टेशनचे निरीक्षक भास्कर नवले यांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही बहिणी चे मृतदेह काढून उमापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.






