मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झालेला आगळावेगळा व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये भर मंडपात गुटखा खाणाऱ्या नवरदेवाला नवरीने चांगलाच धडा शिकवला आहे. नवरीच्या भीतीने नवरदेवसुद्धा एका क्षणात ताळ्यावर आला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अतिशय मेजदार आहे. या व्हिडीओमध्ये लग्नसमारंभ सुरु आहे. लग्न सोहळ्यात लग्नविधी सुरु असताना नवरी आणि नवरदेव एकमेकांच्या बाजूला बसले आहेत. याच वेळी समोर नवरदेव आणि त्याचा मित्र गुटखा खात असल्याचे पाहून नवरी चांगलीच भडकली आहे. नवरीने दोघांना चांगलच झापलं असून थेट मारलंसुद्धा आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये लग्नविधी सुरु असताना नवरदेव आणि त्याच्या मित्राने गुटखा खाल्ला आहे. हे समजताच नवरी चांगलीच खवळलीय. तिने थेट नवरीच्या मित्राला थेट मारलं आहे. तसेच नवरदेवालाही झापलं आहे. नवरीचा हा अवतार पाहून नवरदेव घाबरला आहे. नवरी रागावल्यामुळे नवरदेवाने तोंडातील गुटखा फेकून दिलाय. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय.






