मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : ‘गंदी बात’ या वेब सीरिजमध्ये दिसलेली अभिनेत्री गहना वशिष्ठ ने आता पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. ती राज कुंद्राच्या पॉर्न फिल्म प्रकरणात आरोपी आहे. स्वतःचा एक फोटो इन्स्टाग्राम शेअर करत एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे.
इन्स्टाग्रामवर जो फोटो गेहनाने शेअर केला, त्यात तिचे कपडे फाटलेले दिसत आहेत. या फोटोसह तिने लिहिले की, ‘पोलिसांनी माझी ही दुर्दशा केली आहे. सर्व बँक अकाउंट फ्रीज केले आहेत, पैसे नाहीत, घरी जाता येत नाही कारण घरी गेले तर पोलीस पुन्हा अटक करतील. सर्व मोबाइल, लॅपटॉप घेतले. गेल्यावेळी जामीनासाठी गाडी गहाण ठेवली होती.
गहनाने लिहिले की, ‘मी काही अज्ञात लोकांसोबत राहत आहे. अज्ञात लोकांनी घराचा ताबा घेतला आहे. वकिलांची फीही दुसऱ्यांकडे पैसे उधार मागून भरली आहे. मुंबई पोलीस यापेक्षा जास्त काय कराल.. याहून जास्त तुम्ही काय बिघडवू शकता..’
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांनी गेहनाला अश्लील चित्रपट बनवून अॅप्सवर प्रसारित केल्याबद्दल अटक केली होती. चार महिने कोठडीत घालवल्यानंतर ती सध्या जामिनावर बाहेर आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर गेहनाने त्याला पाठिंबा दिला होता आणि लोकांना पॉर्न आणि इरॉटिक व्हिडिओंमधील फरक समजावून सांगितला होता.






