कहाटूळ येथे दहावी व बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

शहादा (विजय पाटील) – आज रोजी के वाय आर पाटील विद्यालय व आनंद कनिष्ठ महाविद्यालय कहाटूळ येथे सन 2019 20 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी व बारावी या वर्गात विशेष प्रावीण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला .
याप्रसंगी इयत्ता दहावीत प्रथम क्रमांक कु.आरती कृष्णा पवार हिला 89.20 % संपादन करून यश प्राप्त केले. द्वितीय क्रमांक खैरनार मोहित विलास 88.60% व तृतीय क्रमांक पाटील वैष्णवी नरेंद व सोनवणे दिनेश शांतीलाल 86.20% यांनी प्राप्त केला. तसेच इयत्ता बारावीत प्रथम क्रमांक राकेश सुकलाल तपासे याने 65.59 टक्के मिळवून तर द्वितीय क्रमांक गणेश धनराज रोकडे व रोहित ईश्वर पाटील यांना प्रत्येकी 62.15% प्राप्त केले आणि शोभा लक्ष्मण चव्हाण हिने 60.30% मिळवून तृतीय क्रमांक संपादित केला केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री एस .एस.चौधरी यांनी केले.1965 पासूनची यशोगाथा कायम राखत या वर्षीही शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता दाखवून दिली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हंसराज चौधरी यांनी केले. सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थान शाळेचे संचालक श्री दत्तू नथू पाटील यांनी भूषवले व विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला .. कार्यक्रमास उपस्थित पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी यांनी सोशल डिस्टंसिंग चे व्यवस्थित पालन केले व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन श्री सुनिल पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here