नंदुरबार येथे महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार

शहादा (विजय पाटील) – महसूल दिनानिमित्त राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादाजी भुसे, विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या उपस्थितीत नाशिक विभागांतर्गत ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे – कोतवाल संवर्ग-लक्ष्मण गावीत, करंजी बु.ता.नवापूर, मुकुंद पवार तहसील कार्यालय अक्कलकुवा, सुनिल पावरा, पिंगाणे ता.शहादा, शिपाई संवर्ग-सागर सनसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, कविता बारी उपविभागीय अधिकारी कार्यालय नंदुरबार, देविचंद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी कार्यालय शहादा, सागर आव्हाड, तहसील कार्यालय अक्राणी, वाहन चालक-राजेंद्र गिरासे, तहसील कार्यालय शहादा, लिपीक-हितेंद्र चत्रे, जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार, तुषार साळुंखे, तहसील कार्यालय नंदुरबार,गजानन जांबरे तहसील कार्यालय तळोदा, कपिल परदेशी तहसिल कार्यालय शहादा, तलाठी संवर्ग-बळीराम चाटे, तहसील कार्यालय तळोदा, अमोल बोरसे तहसील कार्यालय अक्राणी, मंडळ अधिकारी-भानुप्रिया सुर्यवंशी म्हसावद, अव्वल कारकून-सुनिल खैरनार जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार, नायब तहसिलदार-विजय कच्छवे अक्कलकुवा, तहसिलदार-भाऊसाहेब थोरात नंदुरबार, उपजिल्हाधिकारी-बबन काकडे नंदुरबार, अपर जिल्हाधिकारी-महेश पाटील नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here