नारळी पौर्णिमेनिमित्त भायखळ्यात फोडले नारळ

मुंबई(कुलाबा) (प्रमिला जाधव) – भायखळा नागरिक समितीच्या वतीने नारळी पौर्निमेनिमित्त भायखळा येथे सोशल डिस्टन्स पाळून नारळ फोडण्याच्या पारंपारिक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेमध्ये नागरिकांनी सहभाग घेऊन नारळ फोडले. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे एका वर एक नारळ आपटून फोडला जातो त्यामध्ये ज्याचा नारळ शेवटपर्यंत राहतो तो स्पर्धक विजयी होतो. या खेळत 100पेक्षा जास्त नारळ फोडण्यात आले. या स्पर्धेमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विध्यार्थ्यानी सुद्धा आवर्जून सहभाग घेतला होता. ज्येष्ट नागरिक आणि महिलांनी हि या स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here