कोरोनाने गाठला १२ हजारांचा आकडा

जळगाव (प्रतिनिधी) – आज (दि.३) कोरोना संशयितांच्या तपासणीसाठी घेतलेल्या स्वॅबचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात नव्याने 283 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली असून कोरोनाने बारा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. एकूण रुग्णसंख्या 12 हजार 036 झाली आहे. सर्वाधिक 95 कोरोबाधित रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर दिवसभरात 266 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आज सोमवारी नव्याने 283 कोरोनाबाधित आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 95, जळगाव ग्रामीण 33, भुसावळ 3, अमळनेर 24, चोपडा 34, पाचोरा 2, भडगाव 3, धरणगाव 4, यावल 13, एरंडोल 22, जामनेर 24, रावेर 6, पारोळा 5, चाळीसगाव 1, मुक्ताईनगर 14 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 9 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव तालुका 3, जळगाव शहर 2, तर एरंडोल, पारोळा, भडगाव व यावल तालुक्यातील प्रत्येकी एका बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे , अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here