इचलकरंजी (महाराष्ट्र सह संपादक मनोज सोनवले) : कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस वाढली असून इचलकरंजीतही काँग्रेस वाढवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून काँग्रेसला पुन्हा नक्कीच चांगले दिवस येणार आहेत. सत्तेत असल्याशिवाय सर्वमान्य जनतेला आपण न्याय देऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं आगामी नगरपालिका निवडणुकीचे टार्गेट ठेवून नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन आमदार राजुबाबा आवळे यांनी केले. इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिवपदी शशांक बावचकर यांची निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी आमदार राजुबाबा आवळे यांच्या हस्ते बावचकर यांचा सत्कार करण्यात आला.
आमदार राजुबाबा आवळे यांनी काँग्रेस पक्षाने मोठे केले आहे याची जाणीव ठेवून बावचकर अडचणीच्यावेळी काँग्रेस सोबत राहिले आणि काँग्रेस वाढीसाठी सदैव प्रयत्नशिल आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने केलेला सन्मान सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रेरणा देणारा आहे. कार्यकर्त्यांनी सदैव काम करत राहिले पाहिजे. पक्ष वाढण्यासाठी कार्यकर्त्यांची साथ महत्वाची असते. सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांची कामं करू शकत नाही. त्यामुळे आपसात भांडत न बसता पक्षाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवावेत.कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस वाढली असून इचलकरंजीतही काँग्रेस वाढवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून काँग्रेसला पुन्हा नक्कीच चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचे टार्गेट ठेवून जोमाने कामाला लागावे, असे आवाहन केले.
संजय गांधी योजनेचे शहराध्यक्ष राहुल खंजिरे यांनी मल्हारपंत बावचकर यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलं. त्यांच्याप्रमाणंच शशांक बावचकर यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने प्रदेश सचिव पदाची जबाबदारी सोपवली आहे. काँग्रेसमध्ये कार्यकर्त्याची आर्थिक क्षमता, जात-पात पाहिली जात नाही तर सच्च्या कार्यकर्त्यांचा पक्ष सन्मान करतो हेच यातून दाखवून दिलं आहे. पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीशी ढाल म्हणून सदैव उभा आहे. त्यामुळे काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कोणालाही न घाबरता ठामपणे पक्षाचे विचार सर्वसामान्यांसमोर मांडावेत. पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजेच बावचकर यांचा खरा सत्कार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या प्रमिला पाटील, नगरसेवक अमरजित जाधव, माजी नगरसेवक प्रमोद पाटील, धनाजी नाईक, उदय गिते, बाबासाहेब कोतवाल, शशिकांत देसाई, सचिन साठे, प्रविण फगरे, रियाज चिक्कोडे यांनी यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं.
सत्काराला उत्तर देताना काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी काँग्रेसमुळे सर्वकाही मिळवणारे संकटकाळात काँग्रेसला सोडून गेले. मात्र त्या संकटातही काँग्रेस वाढवण्यासाठी प्रयत्न केल्याच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने सचिव पदाची जबाबदारी देऊन केलेला माझा सन्मान म्हणजे सर्व कार्यकर्त्यांचा सन्मान आहे. नेहमीच सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करणार्या काँग्रेसला 136 वर्षांची परंपरा आहे. हीच परंपरा भविष्यात हेच विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवून काँग्रेस वाढवण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करूया. केंद्र सरकार भांडवलदारांना मोठे करत आहे. या धोरणा सर्वांनी मिळून विरोध करूया. सन्मानाचे पद मिळाले असले तरी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून सदैव जमिनीवर पाय ठेवून पालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,अशी ग्वाहीही त्यांनी दिली. सत्कार सोहळ्यास शहर काँग्रेस अध्यक्ष संजय कांबळे, महिला अध्यक्षा मिना बेडगे, prmila तुकाराम पाटील, राजन मुठाणे, नगरसेवक राजवर्धन नाईक, अरुण गिते, हारुण खलिफा, समिर शिरगावे, प्रमोद म्हेत्रे, अजित मिणेकर, रियाज जमादार सुदाम सोळुंके प्रमोद नेजे, संग्राम घुले सतीश कांबळे नामदेव कोरवी शेखर पाटील प्रशांत लोले शिवाजी चव्हाण ताजुद्दीन खतीब हरीश शेरी गार नासिर गवंडी सौ विद्या भोपळे सौ हमीदा हसुरे सौ पवार वहिनी इत्यादी कार्यकर्ते बंधू-भगिनी उपस्थित होते.






