समर्थ सायन्स अँकडमीचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला उत्साहात
चोपडा (प्रतिनिधी मिलिंद वाणी) : येथील समर्थ सायंस अँकडमी या माध्यमातून संचालक घनशाम पाटील व त्यांचे सहकारी शिक्षकवृंद अतिशय योग्य रितीने व नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.त्याचे फलस्वरुप कित्येक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आपले नांव पटकावित आहेत.दि.29 रोजी या अँकडमीमधील बायोलॉजी या विषयात प्राविण्य मिळविलेल्या10 वी सीबीएसई,11 वी व 12वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कै.शरदचंद्रिकाअक्का पाटील नगरपालिका नाट्यगृहात अतिशय उत्साहात पार पडला.
व्यासपीठावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी,विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे,शारदा क्लासेस चे प्रकाश देशमुख,डॉ.पांडुरंग वंजी सोनवणे,अग्रसेन कोचिंग क्लासेसचे संचालक विनोद अग्रवाल,पत्रकार संदिप ओली,समर्थ सायंस अकादमीचे संचालक घनशाम पाटील आदिंची उपस्थिती होती.
प्रास्ताविक घनशाम पाटील यांनी करीत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.त्यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे स्वागतपर सत्कार करण्यात आला.तद्नंतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव स्मृतीचिन्हा देऊन करण्यात आला.विवेकानंद विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांनी मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थ्यांनी आवड असलेल्या क्षेत्रात आपले करीअर करावे व समाजाची व देशाची सेवा नोकरीच्या माध्यमातून होणे गरजेचे आहे असे सांगितले.पालक म्हणून विनोद अग्रवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणांत बोलतांना अरुणभाई गुजराथी म्हणाले की,इथे गुणवंतांमध्ये मुलींची संख्या बघितल्यावर भविष्यात प्रत्येक क्षेत्रात मुलांपेक्षा मुलीच आघाडीवर असतील असे चित्र डोळ्यासमोर उभे राहत आहे असे म्हटले व सात्यताने प्रयत्न केल्यास यशप्राप्ती निश्चित होते असा कानमंत्रही विद्यार्थ्यांना दिला तसेच प्रत्येक विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व चतुर व चतुरस्त्र असावे असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाग्यश्री चौधरी हिने तर आभार प्रदर्शन देवश्री भट हिने केले.कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम या राष्ट्रगीतानी करण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करणेकरीता समर्थ सायन्स अँकडमी चे संचालक घनशाम पाटील,त्यांचे सहकारी तुषार मराठे,सादिक शेख व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.






