कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत भिसेगाव येथे रेल्वे स्टेशन पलीकडे फातिमा चर्चमागे बेकायदेशीर अनधिकृत बिल्डिंगच्या विकासकाने एका गांवगुडाला त्रास देण्यासाठी पाठवले होते तेथे महिला कपडे धूत असताना तेथील महिलेची मोबाईल वर शुटिंग करुन तिला हातवारे करून अश्लील शिवीगाळ करीत होता
तेव्हा त्या महिलेनी त्याला जाब विचारला असताना त्याने तिला पुन्हा शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली त्यामुळे तीने देखील त्याला चांगलाच चोप दिला. कर्जत पोलिस ठाण्यात याबाबत झालेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली परंतु पोलिसांनी याउलट त्या गांवगुडाला पाठीशी घातले असून कर्जत पोलिसांनी त्या महिलेची तक्रार घेतली नाही.

हा पिडीत महिलेवर एक प्रकारे अन्याय केला आहे कर्जत पोलिस ठाण्याकडून पिडीत महिलेला न्याय देत नसती तर न्याय कुठे मागायचा?पुरोगामी महाराष्ट्रात अनेक महिलांवर अन्याय, अत्याचार होत आहेत याची दखल घेऊन महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी लक्ष घालून कारवाई करावी अशी पिडीत महिलेची मागणी आहे






