जळगाव (क्राइम रिपोर्टर जमील शेख) : शहरातील मेहरुण परिसरात समाविष्ट असलेल्या तांबापुरा भागात असलेल्या ‘शेराली हॉल’चे महापालिकेतर्फे नव्याने करण्यात येणार्या बांधकामाचे रविवारी, दि. 29 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास महापौर तथा प्रभाग क्र. 15 च्या नगरसेविका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
महापालिकेतील विरोधी पक्षनेते तथा प्रभाग क्र. 15 चे नगरसेवक श्री.सुनिल महाजन, श्री.प्रशांत नाईक, नगरसेविका शबाना बी. खाटील यांचे पुत्र सलमान खाटीक यांच्यासह तांबापुरा भागातील प्रतिष्ठित मान्यवर व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तांबापुरा हा भाग प्रामुख्याने मुस्लिमबहुल वस्तीचा असल्याने महापालिकेने त्यांच्या समाजाभिमुख विविध उपक्रमांसह कार्यक्रमांसाठी ‘शेराली हॉल’ बांधलेला होता. मात्र, त्याची दयनीय स्थिती झाल्याने तो संपूर्णपणे पाडण्यात आला. त्यानंतर हा हॉल विविध सोयी-सुविधांयुक्त होण्याच्या उद्देशातून रविवारी, दि. 29 ऑगस्ट 2021 रोजी महापौर तथा प्रभाग क्र. 15 च्या नगरसेविका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या हॉलच्या बांधकामामुळे मुस्लिम समाजबांधवांच्या विविध कार्यक्रमांसाठी मोठी सोय होणार आहे.






