जळगाव (क्राइम रिपोर्टर जमील शेख) : ‘मराठी फाऊंडेशन’तर्फे शहरातील विविध नागरिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तसेच विविध उपक्रमांतर्गत भेट म्हणून मिळालेल्या वृक्षांच्या रोपांची मेहरुणमधील रामेश्वर कॉलनीतील श्रीस्वामी समर्थ महाराज मंदिर परिसरात रविवारी, दि. 29 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते लागवड करण्यात आली.
‘मराठी प्रतिष्ठान’चे प्रकल्पप्रमुख श्री.विजयकुमार वाणी, महापालिका उपायुक्त श्री.संतोष वाहुळे, सौ. वाहुळे, नगरसेवक श्री.प्रशांत नाईक, शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख सौ.शोभा चौधरी, माजी शहरप्रमुख सौ.मंगला बारी, सामाजिक कार्यकर्त्या सौ.मनीषा पाटील, छायाचित्रकार श्री.सुमित देशमुख, श्री.आशुतोष पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक व वृक्षप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी सर्व मान्यवरांनीही विविध जातींच्या रोपांची लागवड केली.‘मराठी प्रतिष्ठान’तर्फे संपूर्ण जळगावकरांकरिता शहराचे वैभव असलेल्या मेहरुण तलावाच्या काठावर साकारलेल्या फळबाग व रानमेवा प्रकल्पांतर्गतही विविध जातींच्या रोपांची लागवड केलेली आहे.






