आज माझे दोन्ही हात पवित्र व सोन्यासारखे झालेत : महापौर

राष्ट्रीय क्रीडा दिन हॉकी जळगावतर्फे उत्साहात साजरा; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : रविवारी (दि.२९) राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त माझ्या शुभहस्ते जळगावातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व ओलंपियन खेळाडूंचा सत्कार करण्यात आला, आज मी खरोखरच धन्य झाली की माझ्यासारख्या एका शिक्षकाच्या हस्ते महान खेळाडूचा सत्कार झाला. त्यामुळे माझे दोन्ही हात पवित्र होऊन ते सोन्यासारखे झाल्याचा भास मला होत आहे. असे मत जळगाव शहराच्या महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर हॉकी जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्पोर्ट्स हाऊस जळगाव व हॉकी महाराष्ट्र यांच्याद्वारे पुरस्कृत केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.मिलिंद दीक्षित, पोलीस निरीक्षक श्री.विलास शेंडे, जिल्हा परिषदेचे उप कार्यकारी अधिकारी रफिक तडवी, हॉकी जळगाव चे सचिव फारुक शेख, सहसचिव प्रा.डॉ.अनिता कोल्हे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अंजली पाटील, आयशा साजिद, कांचन चौधरी व स्पोर्ट्स हाऊस चे अडव्होकेट आमीर शेख यांची उपस्थिती होती.

सर्वप्रथम पद्मभूषण पुरस्काराने गौरविलेले हॉकीचे जादूगार स्व.मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला महापौर सौ.महाजन यांनी माल्यार्पण केले. राष्ट्रीय खेळाडू शादाब सय्यद यांनी स्व.मेजर ध्यानचंद यांच्याविषयीची माहिती उपस्थितांसमोर विषद केली. जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.मिलिंद दीक्षित यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व विषद केले. पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांनी क्रीडा व करिअर याबाबत मार्गदर्शन करून आपले उदाहरण स्पष्ट केले. शिवछत्रपती अवॉर्डी अंजली पाटील यांनी सुद्धा आपल्या मनोगताद्वारे उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी लवकरच महापौर चषक स्पर्धा तसेच महानगरपालिकेत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल व खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी मनपा व राज्य माध्यमिक विद्यालय प्रयत्नशील राहील असे आश्वासन दिले.

या राष्ट्रीय खेळाडूंचा झाला सत्कार
यावेळी पैरा ओलंपिक खेळाडू व तालुका क्रीडा अधिकारी मार्ग धर्माई (बॅडमिंटन) आंतरराष्ट्रीय खेळाडू आयशा साजिद (कॅरम) कांचन चौधरी (जलतरण) राष्ट्रीय खेळाडू भाग्यश्री पाटील , सानिया तडवी व तहसीन तडवी (सर्व बुद्धिबळ) धनंजय धनगर व सुरज सपके (फुटबॉल) योगेश घोंगडे, सय्यद मोहसीन (कॅरम) शशांक अत्तरदे, जगदीश झोपे, रिषभ कर्वा, तनेश जैन, नचिकेत ठाकूर, निरज जोशी व आशुतोष मालुंजकर (सर्व क्रिकेट) सायली खंडागळे, वर्षा सोनवणे, कोमल सोनवणे, नूतन शेवाळे, जुबेर कुरेशी, तौसिफ कुरेशी (सर्व हॉकी) लियाकत अली सय्यद, अरविंद खांडेकर व मुजफ्फर शेख ( हॉकी प्रशिक्षक) यांचे महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फारुक शेख यांनी तर आभार तालुका क्रीडा अधिकारी सौ सुजाता गुल्हाने यांनी केले.

कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी श्री.एम.के. पाटील, सुजाता गुल्हाने, अरविंद खांडेकर, मार्ग धर्मइ, गोविंद सोनवणे, विनोद कुलकर्णी, विनोद माने, सेंटर रेल्वेचे अकील शेख, भुसावळ चे शोएब खान, मजाज खान, आमिर खान (मिली), जुबेर खान, इम्रान बिस्मिल्लाह, शारीक सैयद, मुख्तार पिंजारी आदींसह खेळाडूंची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here