जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : शहरातील प्रतापनगरातील श्रीस्वामी समर्थ महाराज मंदिरात आज शुक्रवार, (दि. 27) रोजी सकाळी आठच्या सुमारास नित्यनियमाप्रमाणे श्रावण मासानिमित्त तेथे स्थापित महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेली तुळजापूर निवासिनी, महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आराध्यदेवता, कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेची मनोभावे पूजा-अर्चा करून दर्शनासह मंगलारती करताना महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन. शेजारी शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख सौ.शोभा चौधरी व सेवेकरी.
याप्रसंगी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेसह अन्य देवतांचेही पूजन करून दर्शन घेतले.






