हिंगणघाट येथील सामाजिक संस्था हेलपिंग हँड द्वारा स्व मिर्झा परवेझ बेग स्मूर्ती प्रित्यर्थ निशुल्क रोग निदान व उपचार शिबिर संपन्न

हिंगणघाट (प्रतिनिधी आसिफ कुरैशी) : येथे रविवारी हिंगणघाट येथील सामाजिक कार्यकर्ते स्व हाजी मिर्झा परवेज बेग यांच्या स्मृर्तीप्रित्यर्थ त्यांचे पुत्र हुमायू बेग आणि सहकारी मित्र परिवार द्वारा केजीएन हॉलमध्ये रोग निदान व उपचार शिबिर आयोजित करून शहरातील नागरिकांसाठी एक चांगला उपक्रम केला.

सदर शिबिरामध्ये आंतराष्ट्रीय प्रसिद्धी प्राप्त विशेषग्य डॉ हितेंद्र भागवतकर, आणि डॉ निखिल काकानी या दोन्ही डॉक्टरांनी आपली निशुल्क सेवा उपलब्ध करून दिली. या शिबिरात निशुल्क इ सी जी, लिपिड प्रोफाइल टेस्ट, एन्जोप्लास्टिक, एन्जोओग्राफी , आणि शुगर सारख्या रोगांवर टेस्ट करून सल्ला दिला व अतिआवश्यक रोगांवर उपचार साठी निशुल्क उपचार करण्याचा आश्वासन दिला. शिबिरामध्ये २२० पेक्षा जास्त लाभार्थ्यांनीं याचा लाभ घेतला.

hinganghat-aarogya-shibir

या शिबिराच्या उद्‌घाटन प्रसंगी हिंगणघाट विधानसभा चे आमदार समिरभाऊ कुणावार, पोलीस निरीक्षक संपत चौंहान, रोटरी क्लब चे संस्थापक डा अशोक मुखी, रोटरी चे अध्यक्ष जितेंद्र केदार, गिमा टेक्सटाईल फॅक्टरी मॅनेजर शाकिर पठाण, एड इब्राहिम बक्ष आझाद, प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार कुणावार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना सांगितले मिर्झा परवेज बेग यांच्या सामाजिक बांधिलकी ला विसरू शकत नाही, आणि हुमायू मिर्झा बद्दल त्यांनी सांगितले की असे कार्यक्रम नेहमी करायचे,, या अगोदर याच्या पेक्षा मोठा निशुल्क रोग निदान शिवीर आयोजित करा आणि जे काही मदद लागेल मी त्या साठी तत्पर आहे.

या शिबिराला यशस्वी करण्यासाठी मिर्झा दौलत बेग, मिर्झा हुमायू, हाशिम शेख, फहीम शेख, तालिब शेख, नईम मलक, युनूस शेख, रंजित कछवा, अजहर शेख, इत्यादी कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here