कर्तव्यदक्ष ठाणेदार समाधान वाठोरे यांच्यावर षड्यंत्र रचून अन्याय झाल्यास आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही – संपर्क प्रमुख पंढरी गायकवाड
वाशिम (प्रतिनिधी) – शिरपूर जैनच्या राजकारणात काही राजकीय कार्यकर्त्यांनी व काही पत्रकारांनी तर हद्दच पार केली, जे पोलिस प्रशासन स्वतःचा जीव धोक्यात घालून, परिवाराची पर्वा न करता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर उतरून लढा देत आहेत,पोलिस प्रशासनावर एवढा ताण असून सुद्धा ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत,२० ते २२ हजार लोकसंख्येच्या शिरपूर जैन या गावात कायदा सुव्यवस्था टिकून ठेवण्याचे काम येथील पोलिस प्रशासन करत असताना जवळपास जेवढे खेडे शिरपूर पोलिस स्टेशन च्या अखत्यारीत आहेत ते सांभाळून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस स्टेशन चे ठाणेदार समाधान वाठोरे यांनी नागरिकांना वेळोवेळी सुरक्षित राहण्याचे आवाहन केले, शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करण्यास सांगितले, जनतेला भयभीत न होऊ देता योग्य मार्गदर्शन शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार समाधान वाठोरे यांनी केले आहे.
कोरोनाच्या कार्यकाळात पोलिस प्रशासनाने खूप मोठा लढा देण्याचे काम केले आहे आणि करत आहेत. परंतु शिरपूर च्या काही राजकीय कार्यकर्त्यांना व काही पत्रकारांना काय ते पचेना, शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार समाधान वाठोरे यांच्या तडकाफडकी बदलीची रणनीती रचली जात आहे, शिरपूर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक नेमण्यात यावा अन्यथा आम्ही अमुक,टमुक,करू असे काही राजकीय कार्यकर्ते काही पत्रकारांना हाताशी धरून वृत्तपत्रातून फेमस होण्यासाठी षडयंत्र रचत आहेत,कारण त्यांच्या मनासारखे काही काळे बेरे घडत नसेल.पोलीस प्रशासन कोणाच्या ही वैयक्तिक बाजूने लढत नाही, पोलिस प्रशासन हा कायद्याच्या बाजूने चालणार आहे,आणि तेच पोलिस स्टेशनचे ठाणेदार समाधान वाठोरे करत आहेत,जो सद्रक्षणाय, खलनिग्रहाय,या तत्वावर पोलिस बांधव चालतात, तरी ना.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व ना.गृहमंत्री अनिलजी देशमुख, वाशिम पालकमंत्री शंभूराजे देसाई व वाशिम पोलीस अधीक्षक वसंत परदेशी आपणास महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने विनंती आहे की अश्या खोट्या तक्रारी बद्दल आपण शहानिशा करून शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार समाधान वाठोरे यांच्यावर अन्याय होऊ देऊ नये या कोरोनाच्या महामारी मध्ये ठाणेदार समाधान वाठोरे यांनी खूप मोठा लढा दिला आहे म्हणून सर्व सुरळीत चालू आहे याचा बिचार करावा हीच विनंती, जर पोलिस अधिकारी कर्मचारी यांच्यावर काही राजकीय कार्यकर्त्यांनी दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना शांत बसणार नाही लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला आहे.







