रेकॉर्डवरील गुन्हेगार सापडला; पेट्रोलिंग करत असताना युनिट -१ गुन्हे शाखेने केली अटक

पुणे (पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक सदानंद काळे) : दिनांक २७/०८/२०२१ रोजी युनिट – १ गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे युनिट -१ च्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग व गुन्हेगार चेकिंग करीत असताना पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे व महेश बामगुडे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की , रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे सचिन रणदिवे हा मिरा सोसायटी शंकरशेठ रोड , पुणे . या ठिकाणी रोडवर येथे उभा आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्या बातमीचा आशय वरिष्ठांना कळवुन त्यांचे परवानगीने युनिट -१ , गुन्हे शाखा , पुणे शहर पथकाकडील स्टाफसह बातमीप्रमाणे दोन पंचासह जावुन छापा घातला.

सदर इसम मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सचिन आप्पा रणदिवे वय ३१ वर्षे रा . शनीनगर जांभुळवाडी रोड , आंबेगाव खुर्द पुणे असे असल्याचे सांगीतले . त्याची स्टाफचे मदतीने पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचा शर्टचा आत लपवून ठेवलेली १ पिस्टल व १ काडतुस मिळुन आल्याने सदरचा ५१,००० / – रु किमतीचा माल पंचा समक्ष जप्त करुन त्याचेविरुध्द खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंवर ३१७/२०२१ आर्म अॅक्ट क ३ ( २५ ) व महा.पो.अधि . क ३७ ( १ ) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे . सदर आरोपी याने सदरचे पिस्टल जवळ बाळगण्याचा मुख्य उद्देश काय आहे या बाबत अधिक तपास करता त्याने सांगितले आरोपीने एकाचा सन २०१० मध्ये खुन केला होता त्याच्या पासुन जिवाला भिती असल्याने सदरचे पिस्टल ठेवले होते अशी माहिती पोलीसांना दिली आहे . सदर आरोपीविरुध्द हवेली पोलीस ठाणे पुणे ग्रामीण येथे खुन , खुनाचा प्रयत्न , मारामारीचे ३ गुन्हे दाखल आहे .

सदरची कामगिरी आर्थिक व सायबर गुन्हे शाखा पुणे शहर चे पोलीस उप आयुक्त मा श्रीमती भाग्यश्री नवटके ( अति कार्यभार अपर पोलीस आयुक्त गुन्हे ) , पोलीस उप आयुक्त गुन्हे . श्री श्रीनिवास घाडगे , सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -१ श्री सुरेंद्र देशमुख यांचे मार्गदशना खाली युनिट -१ गुन्हे शाखा , पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेश संखे , पोलीस उप – निरीक्षक सुनिल कुलकर्णी , संजय गायकवाड पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे , महेश बामगुडे , अशोक माने , शशीकांत दरेकर , विजयसिंग वसावे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here