अरमान कोहली ड्रग्ज प्रकरणी दोघा नायजेरियनसह चौघांना अटक

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : अभिनेता अरमान कोहली याच्या ड्रग्ज कनेक्शन संबंधातून अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) २ नायजेरियन नागरिकांसह चौघा जणांना अटक केली आहे.

एनसीबीने अरमानला अटक करून दक्षिण अमेरिकेतून मागवलेल्या कोकेनच्या तस्करीचा तपास केला असताना दोन विदेशी नागरिकांसह चौघांना अटक करून ११८ ग्रॅम एमडी व १३ ग्रॅम कोकेन जप्त केले. जुहू गल्ली येथून मोहम्मद एजाज सय्यद ऊर्फ चिया भाई याला पकडून एमडी जप्त केले. त्याचा साथीदार इम्रान अन्सारी तसेच नायजेरियन नागरिक उबा चिन्सो विझडोम, याला नालासोपारा येथून अटक केली तो एमडीचा मुख्य पुरवठा करणारा होता.

माहितीतून एनसीबीने नवचिसीओ इस्राल नवाचूवू ऊर्फ सॅमला मंगळवारी आरे कॉलनी येथून अटक केली. तो दक्षिण अमेरिकन कोकेनची आयात करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एनसीबीच्या पथकाने संडे ओकेकी ऊर्फ सनी या नायजेरियन नागरिकाला नालासोपारा येथून अटक केली. तो काही अभिनेत्याकडे बॉडीगार्ड व बाउन्सर म्हणून काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here