ड्रग्ज प्रकरणी अरमान कोहली याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : मुंबईतील न्यायालयाने अभिनेता अरमान कोहली याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अरमान कोहली याच्या मुंबईतील घरात ड्रग्ज जप्त केल्यानंतर एनसीबीने त्याला अटक केली होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणातील धाडीचं सत्र सुरू झालं आहे. आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींची ड्रग्ज प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. अरमान कोहली याला मुंबई न्यायालयाने तब्बल १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या टीमने शनिवार सकाळी एका ड्रग पेडलरला अटक केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here