‘सृष्टी ब्यूटिपार्लर’द्वारे प्रशिक्षित विद्यार्थ्यांना महापौर सौ.महाजनांच्या हस्ते साहित्य वितरण; प्रशिक्षितांना व्यवसाय सुरू करण्यासाठी होणार मदत

जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : शहरातील मेहरुण परिसरातील रामेश्वर कॉलनीतील प्रसिद्ध ‘सृष्टी ब्यूटिपार्लर’तर्फे समाजातील मुली, महिलांनी स्वावलंबी होऊन त्यांना स्वतःकडे असलेल्या ज्ञानाच्या जोरावर रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशातून काही दिवसांपासून स्वयंम सिद्धंम स्वरोजगारमुखी ब्यूटिपार्लर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेला होता. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा आज गुरुवार, दि. २ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी समारोप करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख अतिथी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मुली, महिलांना प्रमाणपत्र व ब्यूटिपार्लर साहित्याचे वितरण करण्यात आले. स्वयंम सिद्धंम स्वरोजगारमुखी सायली कॉस्मेटिक, जळगावचे संचालक श्री.संजय पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

रामेश्वर कॉलनीतील प्रसिद्ध ‘सृष्टी ब्यूटिपार्लर’तर्फे मुली, महिलांसाठी नेहमीच अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले जाते. सौ.सपना मोरे, मंदा सपकाळे, दुर्गेश्वरी पाटील, भारती वरळे, चैताली कोल्हे, सोनाली वरळे, रिमझिम कोल्हे, मानसी भोवरे, भाग्यश्री चौधरी, आरती आरसूळ, देवयानी सोनवणे, खुशबू निनाद, राणी चव्हाण, राधा लाळगे आदी १४ मुली, महिलांना प्रमाणपत्र व ब्यूटिपार्लर साहित्याचे या कार्यक्रमाप्रसंगी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. ‘सृष्टी ब्यूटिपार्लर’च्या संचालिका सौ.प्रियंका किरंगे यावेळी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here