जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : शहरातील रंगकाम करीत असताना एका ४० वर्षीय तरुणचा इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यु झाला, ही घटना पांडे चौकात घडली असून बाबूलाल बनीमिया पटेल (वय ४०) असे मृत्यु तरुणाचे नाव आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील तांबापुरा भागातील बाबूलाल पटेल हे पेंटरचे काम आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करत असत. बुधवारी पांडे चौकातील सुरेंद्र नथमल लुकंड यांच्या पत्र्याच्या शेडला रंगकाम करण्याचे काम करीत असताना त्यांना इलेक्ट्रिक वायरला धक्का लागला. त्यात त्यांचा विजेचा धक्का लागून त्यांचा घटनास्थळीच मृत्यु झाला.
मयत झालेल्या तरूणाची घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यांने कुटुंबियाला आर्थिक मदद मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई आबेदाबी, पत्नी फरीदा, आणि मुले फरान, सना, शाहीन, आणी लतीफ, हारून, शरीफ, हे तीन भाउ असा परिवार आहे. मयत बाबूलालच्या नातेवाईकांना काम करुन घेणाऱ्या व्यक्तिकडुन आर्थिक मदद न मिळाल्यास मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पावित्रा हिंदू- मुस्लिम एकता बिल्डिंग वेलफेयर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष इस्माइल खान, जिल्हा सल्लागार अखिल शेख अहमद, दगडु शाह पेंटर आदींनी घेतला आहे.






