कर्जत (प्रतिनिधी जयेश जाधव) : ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्यावर कर्तव्य बजावत असताना फेरीवाल्यांने भ्याड हल्ला केला,या हल्ल्यांमध्ये त्या जखमी झाल्या या हल्ल्याच्या निषेधार्थ झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ, नियम कायदे मोडणाऱ्यांनी केलेल्या कृत्याचा जाहीर निषेध म्हणून तसेच गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी राज्यस्थरीय मुख्याधिकारी संघटनेचे कोकण विभागीय संघटक डॉक्टर पंकज पाटील आणि रायगड जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायती मुख्याधिकारी यांनी अलिबाग येथे जाऊन माननीय रायगडचे जिल्हाधिकारी डाॅ महेंद्र कल्याणकर यांना आज निवेदन सादर केले.
यावेळी राज्यस्तरीय मुख्याधिकारी संघटनेचे कोकण संघटक डॉ.पंकज पाटील यांच्या समवेत अनेक मुख्याधिकारी उपस्थित होते






