महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने नवरत्न व आदर्श माता -पिता पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई (प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) : महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने प्रतिवर्षी विविध क्षेञातील कर्तृत्वसंपन्न मान्यवरांचा गौरव करण्यात येतो.प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी नवरत्न पुरस्कार तसेच पत्रकारीतेतील (प्रिंट,इलेक्ट्रॉनिक व डिजीटल मिडीया), शैक्षणिक, सामाजिक, सहकार,वैद्यकीय, महिला,कला , क्रिडा , साहित्य , पर्यावरण , उद्योग,कृषी,प्रशासकीय आदी क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केलेल्या स्त्री- पुरुष तसेच संस्थांना अप्रतिम सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल,श्रीफळ,गौरव विशेषांक देवून दिग्गज मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे .तरी इच्छुकांनी फॉर्मसाठी आपले नाव पत्ता सविस्तर कळविताच नामांकन फॉर्म पाठवण्यात येईल. ई मेलवर मागणी केल्यास मेलवरही नामांकन फाॅर्म पाठवून देण्यात येईल.

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सर्व जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांचेकडे मागणी केल्यासही सदर नामांकन फॉर्म मिळू शकेल.परिपूर्ण माहितीसह नामांकन फॉर्म पाठवण्याची अंतीम तारीख 10 सप्टेंबर 2021 पर्यंत असल्याची माहिती संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर, संघाचे राज्य प्रमुख पदाधिकारी सागर पाटील,विनोद वर्मा,बाबासाहेब राशिनकर,डॉ.सुनील भावसार, राजेश जोष्टे, सचिन बैरागी, संजय नवले,शेखर सुर्यवंशी , शिरीष कुलकर्णी, प्रकाश वंजोळे, प्रशांत लाड ,आण्णासाहेब कोळी, प्रतापराव शिंदे ,महेश मोटे,प्रा.किरण जाधव, अनिल उपाध्ये,सोमनाथ पाटील, आदींनी प्रसिद्धी पञकाव्दारे दिली आहे.अधिक माहितीसाठी पुढील फोनवर 9422420611 संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here