कर्जत (प्रतिनिधी जयेश जाधव) : कर्जत नगरपरिषदेच्या हद्दीतील आकुर्ले येथे भाजप महिला मोर्चा कर्जत शहर वतीने आजुबाजुला परिसरातील व बामचा मळा विभागातील नागरिकांना कोवीड १९ या विषाणूंला रोखण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण व्हावे यासाठी भाजप महिला मोर्चा कर्जत शहर सरचिटणीस गितांजली देशमुख यांच्या पुढाकाराने बामचा मळा स्काय लाईन अपार्टमेंटमधे ज्या नागरिकांचे पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झाले अशा नागरिकांसाठी कोविशिल्ड दुसरा डोस लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
याप्रसंगी भाजप कर्जत शहराध्यक्ष व विघमान नगरसेवक बळवंत घुमरे, कर्जत शहर महिला अध्यक्ष सरस्वती चौधरी,भाजप कर्जत शहर सरचिटणीस प्रकाश पालकर,भाजप रायगड जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, कर्जत नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, जिल्हा सरचिटणीस दिपक बेहरे, भाजप महिला मोर्चा जिल्हा चिटणीस बिनीता बळवंत घुमरे, कर्जत शहर युवा मोर्चा अध्यक्ष मयुर शितोळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.याप्रसंगी नागरिकांनी मास्क वापरून व सोशल डिशटेन्शन नियमांचे पालन करून कोवीडशिल्ड दुसरा लसीकरणाचा लाभ घेतला.






