आता नाट्यगृह उघडणार…. तिसरी घंटा पुन्हा वाजणार..!

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : राज्यातील नाट्यगृह सुरू करण्यासाठी शुक्रवारी दिनांक ०३ सप्टेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची अखिल भारतीय नाट्य परिषद अध्यक्ष: नवनाथ मच्छिन्द्र कांबळी, प्रवक्ते: मंगेश कदम मराठी नाट्यव्यासायिक निर्माता संघ अध्यक्ष: संतोष भरत काणेकर, रंगमंच कामगार संघटना अध्यक्ष: किशोर वेल्ले, विजय केंकरे आदींनी भेट घेतली.

यावेळी रंगकर्मी आंदोलन प्रतिनिधी विजय राणे, आणि ही भेट घडवून आणण्यासाठी पुढाकार घेणारे आदेश बांदेकर , सुबोध भावे. या सगळ्यांच्या उपस्थितीत नाट्यगृह ५०% प्रेक्षक उपस्थितीमध्ये ५ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू करण्याचे आदेश संबंधित सगळ्या शासकीय अधिकारी आणि विभागांना ताबडतोब देण्यात यावे हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here