कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीकडून संशोधन अभ्यासक्रमांची घोषणा

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीकडून दोन संशोधन अभ्यासक्रमांची घोषणा करण्यात आली आहे.’डॉक्टर ऑफ बिझनेस एडमिनिस्ट्रेशन’आणि’पीएचडी बाय पब्लिकेशन’असे हे दोन संशोधन अभ्यासक्रम आहेत. कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक राकेश मित्तल यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मार्गदर्शन आणि दैनंदिन काम सांभाळून हे दोन कालबद्ध संशोधन अभ्यासक्रम करता येणार आहेत.अधिक माहिती https://cvu.education/ या वेबसाईटवर देण्यात आली आहे.संशोधनासंबंधी महत्व आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत असल्याने या दोन अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here