जळगाव (निलेश पाटील) – काल (दि.३) शहरातील दीपस्तंभ फौंडेशन या संस्थेच्या मनोबल अपंग व अनाथ तरुण तरुणीसाठी निवासी प्रकल्पाला लायन्स क्लब जळगाव सेन्ट्रल संस्थेतर्फे एक़्वागार्ड पेयजल प्रणाली स्थापित करण्यात आली. त्याच बरोबर अंध विद्यार्थ्यांना उपयूक्त पडेल असे एंजल प्लेयर हे उपकरण व फळे, फेस मास्क देखील वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी लायन्स क्लब जळगाव सेन्ट्रल चे अध्यक्ष सी.ए जयेश ललवाणी, सचिव लायन.अविनाश कक्कड, लायन.अनिश चांदीवाल, लायन. सचिन राका, लायन.मनीष मंडोरा, लायन.शैलेश गांधी, लायन.पराग लुंकड व दीपस्तंभ चे संस्थापक श्री यजुर्वेंद्र महाजन हे उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान श्री यजुर्वेंद्र महाजन यांनी दीपस्तंभ फौंडेशन च्या कार्या बद्दल आणि मनोबल या प्रकल्पा बद्दल माहिती दिली व या कार्यक्रमाचे ज्यांनी प्रायोजकत्व स्वीकारले ते चोथानी आणि कक्कड परिवार व सचिनजी राका यांचे व लायन्स सदस्यांचे आभार मानले. तसेच लायन्स क्लब जळगाव सेन्ट्रल च्या वतीने अध्यक्ष सी.ए जयेश ललवाणी, यांनी सर्व लायन्स सदस्य व ज्यांनी या गरजू प्रकल्पाला प्रायोजकत्व दिले अशा सर्वांचे आभार मानले.
Home राज्य उत्तर महाराष्ट्र लायन्स क्लब जळगाव सेन्ट्रल या संस्थेतर्फे दीपस्तंभ फौंडेशन स्थापित “मनोबल” या प्रकल्पाला...







