मुंबई (प्रतिनिधी आकांक्षा भोगले) : सरकारने नाट्यगृहं आणि चित्रपटगृह सुरु करण्याची परवानगी देण्यासाठी काहिदिवसांपूर्वी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात नटराजाची महाआरती करण्यात आली.
सगळ्यांच्या उपस्थितीत आज महत्वाचा निर्णय घेण्यात आला तो असा की नाट्यगृह ५०% प्रेक्षक उपस्थितीमध्ये जागतिक रंगभूमी दिनी ५ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू करण्याचे आदेश संबंधित सगळ्या शासकीय अधिकारी आणि विभागांना ताबडतोब देण्यात आले.
आता नाट्यरसिक प्रेक्षकांना आणि कलाकारांना दोन महिने अजून वाट पाहावी लगणार आहे.मागील वर्षभरापासून नाट्यकलाकार आणि या संदर्भातील मंडळी नाट्यगृह सुरु करण्याची मागणी करत होते. अखेर हा निर्णय घेण्यात आल्याने आता आमची रोजीरोटी सुरु होईल, अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली आहे.






