पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्या निमित्त पूना ऑप्थल्मोलॉजिकल सोसायटीच्या वतीने रविवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी नेत्रदान विषयक जागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सारसबाग येथे सकाळी सात वाजता जनजागृती मोहिमेला प्रारंभ करण्यात येवून इंडियन मेडिकल असोसिएशन सभागृह (टिळक रस्ता) येथे समारोप करण्यात येणार आहे.यावेळी नेत्रदानाचे संदेश असणाऱ्या मास्कचे नागरिकांना वाटप करण्यात येणार आहे.
पूना ऑप्थल्मोलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.संजय टेकावडे,सचिव डॉ.ऋजुता माचवे,खजिनदार डॉ सीमा खैरे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.२५ ऑगस्ट ते १० सप्टेंबर हा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. त्या निमित हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली.






