राहाता (प्रतिनिधी संजय महाजन) : येथील जितेन्द्र माळवदे यांची भाजपा ओबीसी युवा मोर्चा राहाता तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लोणी येथील जनसेवा कार्यालयात खा. डॉ. सुजयदादा विखे -पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी दाढ बु ! चे मा. सरपंच गोरक्षनाथ पा.तांबे,पंचायत समितीच्या सभापती सौ.नंदाताई गोरक्षनाथ पा.तांबे,भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा सचिव विजयराव पा.तांबे, पद्मश्री डॉ. वि.वि.पा.स.सा. कारखान्याचे माजी संचालक प्रतापराव पा.तांबे, भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव दहिवळकर, सुदाम गाडेकर,उद्योजक प्रशांत पा. तांबे , किरण शहाणे,प्रशांत सातपुते, विजय माळवदे, सुभाष गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.






