मुंबई (प्रतिनिधी अपर्णा पाताडे) : गौतम अदानी यांच्या अदानी समुहातील अदानी ग्रीन एनर्जीची यशस्वी घोडदौड सुरू असून, आता रीलायंस इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी याच ग्रीन एनर्जी क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
हवामान बदलासंदर्भात आंतरराष्ट्रीय जलवायू शिखल संमेलन २०२१
हवामान बदलासंदर्भात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय जलवायू शिखल संमेलन २०२१ मुकेश अंबानी यांनी हरित ऊर्जा क्षेत्रात पाऊल टाकल्याची मोठी घोषणा केली आहे.मुकेश अंबानी यांनी पुढील तीन वर्षात अधिक क्षमतेचे चार विनिर्माण संयंत्र लावण्यासाठी ७५ हजार कोटींची घोषणा केली.
तीन वर्षांत प्रकल्प प्रत्यक्षात येईल
तीन वर्षांत प्रकल्प प्रत्यक्षात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय जलवायू शिखर संमेलनात संवाद साधणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य लवकरच साध्य होण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. हवामान बिघडले तर त्याचा पृथ्वीवर मोठा परिणाम होणार आहे. हवामान बदल हे सध्या जगातील सर्व देशांसाठी मोठे आव्हान आहे.
भारतात एक नवी हरित क्रांती सुरू झाली आहे.
त्यापासून सुटका मिळवण्यासाठी ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून वेगाने पुढे जावे लागणार आहे. भारतात एक नवी हरित क्रांती सुरू झाली आहे. हरित क्रांतीने भारताला खाद्य उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर केले आणि आताची नवी हरित क्रांती ही देशाला ऊर्जा उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यास मदत करेल, असा विश्वास मुकेश अंबानी यांनी यावेळी व्यक्त केला. नवीन ऊर्जा वातावरणासाठी आवश्यक असलेली सर्व महत्वाची उपकरणे तयार आणि एकत्रित करण्यासाठी आम्ही चार मोठे सौर फोटोव्होल्टिक मॉड्यूल कारखाना, ऊर्जा साठवण बॅटरी कारखाना, इलेक्ट्रोलायझर कारखाना आणि इंधन सेल कारखाना निर्मिती कारखाना उभारण्याची योजना आखली आहे.
जस्ट ड्यिल् कंपनीतील हिस्सा
जस्ट ड्यिल् कंपनीतील हिस्सा खरेदीबाबत टाटा समूहाकडूनही एप्रिल महिन्यात प्रयत्न करण्यात आले होते, मात्र बोलणी फिस्कटली होती. त्यानंतर रीलायंस समूहाने यात एंट्री घेतली आणि करार पूर्णत्वास नेला असून, आता ४०.९० टक्के म्हणजेच जवळपास ४१ टक्के हिस्सेदारी रिलायन्सकडे आली आहे.






