‘मनसे’ची मुख्याधिकारी कडे निवेदनाद्वारे मागणी
हिंगणघाट (प्रतिनिधी आसिफ कुरैशी) : शहरातील कोरोना काळातील घर टॅक्स कर ५० टक्के माफ करा यासाठी ‘मनसे’ची नगर पालिका मुख्याधिकारी यांना निवेदनातून मागणी करण्यात आली
शहरात कोरोनाचा काळात राज्य सरकारने लावलेल्या निर्बंधाचे सामान्य जनतेने व छोट्या मोठ्या व्यवसायिकांने काठेकोरपणे पालन केले परंतु यात सामान्य जनतेचे व छोट्या -मोठ्या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या काळात सामान्य नागरिकांचा हाताला काम सुद्धा नव्हते त्यात नगर पालिका प्रशासनाने ठरवलेल्या वेळातच दुकाने सुरू करणे व बंद करणे त्यामुळे दुकानदार व ग्राहकांमध्ये योग्य तेवढा वेळ देता येत नसल्याने त्यांचा व्यवसायावर परिणाम दिसून आला अशा बिकट परिस्थितीत नगर पालिका प्रशासनाने घर टॅक्स कर कमी करावा तसेच शहरात प्रत्येक वॉर्डातील घरा -घरापर्यंत पोहोचनारी घंटा गाडी दररोज प्रभागात दिसाला हवी त्याचप्रमाणे घंटा गाडी च्या टॅक्समध्ये ५% वाढ करण्यात आली ती वाढ पूर्णपणे कमी करावी.
याच बरोबर एक वर्षा पासून शाळा बंद असून टॅक्स मध्ये शिक्षण कर आकारत आहे या शिक्षण कराचा सामान्य जनतेला उपोयोग काय? त्यामुळे हा शिक्षणकर सुध्दा कमी करण्यात यावा. सामान्य माणूस आधीच कोरोना मुळे भरकटला गेला आहे त्यात इतका मोठा प्रमाणात विविध कर लागलेला टॅक्स सामान्य माणूस भरू शकणार नाही त्यामुळे यावर्षी सन २०२०-२१ चा घरघुती टॅक्स नगर पालिका प्रशासनाने ५० टक्के कमी करावा अशी मनसेच्या वतीने मागणी केली. यामुळे सामान्य जनते ला दिलासा मिळेल.
यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर, जिल्हा सचिव सुनील भुते, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष किशोर चांभारे, दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष मारोती महाकालकर, मनसे शहर अध्यक्ष राजू सिन्हा, बचु कलोडे, प्रल्हादजी तुळारे, उमेश नेवारे,रवि सोनकुसरे, परम बावणे, दिपक चांगल, प्रशांत ऐकोणकर, विशाल माथनकर, अमोल मुडे, राजू मुडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.






