कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : पश्चिम महाराष्ट्रात मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला असल्याचं वृत्त समोर येत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कोल्हापुरात रात्री १२ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाच्या या धक्क्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
Earthquake of Magnitude:3.9, Occurred on 04-09-2021, 23:49:28 IST, Lat: 16.74 & Long: 74.06, Depth: 38 Km ,Location: 19km W of Kolhapur, Maharashtra, India for more information download the BhooKamp App https://t.co/jionhekMtJ pic.twitter.com/Z3ly2RXhyM
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) September 4, 2021
http://Seismo.gov.in च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथे रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल नोंदवण्यात आली आहे. कोल्हापुरपासून १९ किलोमीटर पश्चिमेकडे भूकंपाचे केंद्र असल्याचंही म्हटलं जात आहे. न्यूज एजन्सी एएनआय ने सुद्धा या संदर्भातील वृत्त दिलं आहे.






