ठाणे येथील समतोल सेवा कार्यक्रम कार्यालयात संपन्न

ठाणे (प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) : कार्यकर्ता प्रशिक्षण समारोप ठाणे येथील समतोल सेवा कार्यालयात संपन्न झाला. 20 प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी देवेंद्र भुजबळ ( माहिती व प्रसारण म. राज्य), संजयजी केळकर (ठाणे आमदार व समतोल विश्वस्त ), एस.हरीहरण( उद्योजक व समतोल विश्र्वस्त) , विजय जाधव संस्थापक (संचालक समतोल फांऊडेशन), अमोल पाटील (आदर्श शिक्षक पोलीस शाळा), प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक, मार्गदर्शन करणारे तज्ञ समतोल कार्यकर्ते उपस्थित होते.

आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने समारोप कार्यक्रम योगायोगाने आज झाला. तरुण पिढी सक्षमपणे उभी राहण्यासाठी कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग समतोल सेवा सातत्याने चालवित आहे. विद्यार्थी सपना गुप्ता हिने हिंदी भाषीक असुनही मराठी भाषा अत्यंत सुरेख बोलुन आम्ही काय शिकलो हे सांगुन उपस्थितितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जनसेवक संजयजी केळकर व हरीहरण सर नेहमीच पुढाकार घेऊन मदत करतात त्यामुळे सर्व जण आनंदी होते.

पुढील बँच 18 सप्टेंबर ला सुरु होईल. कार्यक्रम सुत्रसंचालन राजेंद्र गोसावी यांनी केले. आजचा दिवस खरा शिक्षक दिन म्हणून समतोल मध्ये साजरा झाला असे प्रमुख पाहुणे देवेंद्र भुजबळ सर यांनी व्यक्त केले. असे कार्यक्रम अशा प्रकारे सातत्याने सुरु ठेवून कार्यकर्ते सक्षमपणे उभे राहण्यासाठी समतोल मित्र महाजन यांनी 50 हजाराची देणगी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here