पुणे (महाराष्ट्र उपसंपादक वासंती देवळे) : सोमवारी (दि.६) भारतीय जनता पार्टी पुणे शहर व वकील आघाडीतर्फे डेक्कन जिमखाना पोलीस स्टेशनला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत गुन्हा दाखल करावा म्हणून अर्ज देण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीत, सरचिटणीस नगरसेवक राजेश येनपूरे, सरचिटणीस नगरसेवक दिपक पोटे, सरचिटणीस दिपक नागपुरे, वकील आघाडी अध्यक्षा ॲड. इशानी जोशी, ॲड.मोहना गद्रे, सरचिटणीस ॲड.काळभोर, उपाध्यक्ष ॲड.श्रीराम कांबळे, ॲड.अनिषा फणसळकर, ॲड. जयश्री बिडकर, ॲड. सागर टिकार, ॲड.राजन देशपांडे, ॲड.सचिन राणे, ॲड.अभिजीत पाठक, ॲड.वैजनाथ विंचूरकर, ॲड.सचिन कुलकर्णी, ॲड. अक्षय क्षीरसागर आदी उपस्थित होते.






