हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ व्याख्यान संपन्न

‘लव्ह जिहाद’चे समूळ उच्चाटन करण्यासाठी इस्रायलप्रमाणे कठोर कायदे होणे आवश्यक ! – सुनिल घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

जळगाव (महाराष्ट्र संपादक सुनिल पाटील) : धर्मांधांचे हिंदु नाव धारण करणे, नवरात्रोत्सवात हिंदु युवतींसमवेत गरबा खेळणे, विविध ‘डे’ च्या दिवशी भेटवस्तू देणे, हिंदु स्त्रियांना भ्रष्ट करणे, त्यांचे धर्मांतर करणे, भरमसाठ अपत्य जन्माला घालणे, पुढे हीच अपत्ये मोठी होऊन आत्मघातकी पथकांमध्ये सहभागी होऊन देशविघातक कृत्ये घडवून आणणे हे महाभयानक जागतिक षड्यंत्र ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून चालू आहे. ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुली, युवती आणि महिला यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’चे समूळ उच्चाटन करण्यासाठी इस्रायलप्रमाणे कठोर कायदे होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक श्री. सुनिल घनवट यांनी केले.

५ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘लव्ह जिहाद : एक धर्मविरोधी षड्यंत्र’ या विषयावर ‘ऑनलाईन’ व्याख्यानात ते बोलत होते. त्यानंतर नगर जिल्ह्यातील रणरागिणी शाखेच्या कु. प्रतिक्षा कोरगावकर यांनी ‘हिंदु युवतींना स्वरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता’ या विषयी उपस्थितांना संबोधित केले. याचा लाभ ८ सहस्रहून अधिक धर्माभिमानी यांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार कु. रागेश्री देशपांडे यांनी केले.

श्री. घनवट पुढे म्हणाले, ‘‘पालकांनी मुलांना अनिर्बंध स्वातंत्र्य दिल्याने त्यांचे जीवन धोक्यात येत आहे. मुलींच्या भावनांचा आदर करून त्यांना भावनिक आधार देणे आवश्यक आहे. मुलींना धर्माचरण शिकवल्यास त्यांच्यातील आध्यात्मिक सामर्थ्य वाढण्यास साहाय्य होते. एकही हिंदु युवती ‘लव्ह-जिहाद’ला बळी पडणार नाही, असा निश्‍चय करा.”

हिंदु महिला आणि युवतींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देणे आवश्यक ! – कु. प्रतिक्षा कोरगावकर
लव्ह’ म्हणजे फसवे प्रेम आणि ‘जिहाद’ म्हणजे जगावर इस्लामी राज्य प्रस्थापित करणे होय. खोट्या प्रेमात फसवून हिंदु महिला, युवतींचे अश्‍लील चित्रीकरण करून त्यांच्या असहाय्यतेचा अपलाभ घेत पैसे उकळणे, घरातील अनेकांनी त्यांचा उपभोग घेणे, पुढे वेश्यालयात त्यांची विक्री करणे, असे अनेक अघोरी आणि माणुसकीला काळीमा फासणारे प्रकार ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून केले जातात. हे टाळण्यासाठी हिंदु युवतींना धर्मशिक्षण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिक्षा कोरगावकर यांनी केले.

लव्ह जिहाद विरोधातील ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर ‘8’ व्या क्रमांकावर !
या कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागातील हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते, धर्मप्रेमी, हिंदुत्ववादी यांनी एकत्रितपणे #save_hindu_girl या नावाने एक ट्विटर ट्रेंड दु. 4 ते 7 या वेळेत घेण्यात आला. लव्ह जिहादच्या विरोधातील हा ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर ‘8’ व्या क्रमांकावर 1 तास होता.

व्याख्यानाच्या प्रसारकार्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या हिंदुत्ववादी संघटना/संप्रदाय :
अखिल भारतीय वारकरी परिषद, हिंदू राष्ट्र सेना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आदी संघटनांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांनीदेखील या व्याख्यानाच्या प्रसारकार्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here