महाड शहर नगराध्यक्षा सौ.स्नेहल जगताप-कामत यांना आंतरराज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्कार

बेळगावातील राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्थेने केले सन्मानित.

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) : महाडच्या नगराध्यक्षा सौ.स्नेहल जगताप-कामत यांना बेळगाव (कर्नाटक) येथील राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था आणि आरोग्य तथा निसर्ग विकास सोसायटीने ‘सामाजिक सेवा गौरव ‘ पुरस्काराने सन्मानित केले आहे.

या दोन्ही संस्था कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांमध्ये काम करतात. या तीन राज्यांमध्ये सामाजिक , शैक्षणिक, शासकीय आणि निमशासकीय क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या निवडक व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. महाडच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ.स्नेहल जगताप-कामत यांची या पुरस्कारासाठी झालेली निवड महाडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी ठरली आहे.

snehal-jagtap-sanmanpatra

महाडच्या नगराध्यक्षा म्हणून काम करताना शहराच्या विकासाला गती देण्याचे नियोजनबद्ध काम त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे लोकविकास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले आहे.

आपल्याला मिळालेला हा पुरस्कार प्रेरणादायी आणि उत्साह वाढविणारा असल्याची प्रतिक्रिया स्नेहल जगताप यांनी माध्यमांशी बोलताना दिली. हा पुरस्कार केवळ माझाच नव्हे तर महाडचा गौरव वाढविणारा आहे. महाडकरांनी संधी दिल्यामुळेच चांगले काम करण्याची संधी मला मिळाली आहे.त्यामुळे महाडकरांच्या वतीने हा पुरस्कार आपण स्विकारला आहे, तर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मला समाज कारण, राजकारणात काम करण्याची प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळाले त्या स्व. माणिकराव जगताप यांना तो समर्पित करित असल्याची भावना देखील त्यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here